आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना धक्का, वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी घेतला शिवसेनेत प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधानसबा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. नेहमी आपल्या 'खळ्ळ, खट्याक' भूमिकेने सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन नांदकावकरांना शिवबंधन बांधून सेनेत प्रवेश दिला. उमेदवारी न मिळाल्याने नांदगावकर नाराज असल्याचे बोलले जात आहे. 

आपल्या वेगळ्या अशा स्टाईलमुळे नितीन नांदगावकर हे चर्चेत आले होते. मुंबईतील फसवणूक करणाऱ्या टॅक्सी चालकांविरुद्ध त्यांनी आंदोलन पुकारले होते. तसेच इतर अनेक विषयांमध्ये त्यांनी गोर-गरिबांची मदत केली. त्यांच्या या सर्व मदतीचे आणि कारनाम्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर ते प्रकाश झोतात आले.   

बातम्या आणखी आहेत...