Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | MNS leader Raj Thakrey sabha in Nanded against Narendra Modi

'ज्याच्यावर विश्वास टाकला, त्याने केसाने गळा कापला', नांदेडमध्ये राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 08:11 PM IST

मोदी-फडणवीस सत्तेत आल्यापासून 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

 • MNS leader Raj Thakrey sabha in Nanded against Narendra Modi

  नांदेड- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शाहांविरोधात रणशिंग फुंकले आहे. महाराष्ट्रभर ते भाजपविरूद्ध सभा घेणार आहेत. यासाठी एकही उमेदवार उभा न करता ते राज्यभर सभा घेत आहेत. यातील पहिली सभा नांदेडमध्ये पार पडली. ''ज्याच्यावर विश्वास टाकला त्याने केसाने गळा कापला, त्यामुळेच मी राज्यभर मोदींविरोधात सभा घेतोय'', असे राज ठाकरे म्हणाले.


  ''मोदी फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधींबद्दल बोलत आहेत, स्वत:च्या कामाबद्दल कधी बोलणार..? बेरोजगार तरुणांबद्दल कधी बोलणार..? महिला सुरक्षेबद्दल कधी बोलणार..? शेतकरी आत्महत्येबद्दल कधी बोलणार..?''पुलवामातील शहीद जवानांच्या नावे मते मागतायेत, ते काय निवडणुकीला उभे आहेत का? अभिनंदन निवडणुकीला उभा आहे का? ''मोदी जाईन तिथे सभा घेतात, पण कधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांबाबत, तरुणांबाबत बोलले का..?'', हे मुद्देही त्यांनी यावेळी उपस्थित केलेत.

  देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाराष्ट्रात 1 लाख 20 हजार विहिरी खणल्या. कुठे आहेत ह्या विहिरी? देशाने बहुमत देऊन देखील काम करायचे सोडून खोटे बोलत आहेत. आपल्या कामगिरीचा अहवाल द्यायचा सोडून सर्व विषयांवर बोलायला मोदींना वेळ आहे. मराठवाड्यातील जनतेला माझे आवाहन आहे की पाण्याच्या परिस्थितीकडे गांभीर्याने बघा. अशा अनेक मुद्यांवर राज यांनी मोदींवर जोरदार टीका केलीये.


  राज ठाकरेंच्या सभांचे वेळापत्रक
  12 एप्रिल : नांदेड शहर
  15 एप्रिल : सोलापूर
  16 एप्रिल : कोल्हापूर
  17 एप्रिल : सातारा
  18 एप्रिल : पुणे
  19 एप्रिल : महाड, रायगड

Trending