आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसे 'राज'कारण; राजाची आघाडीला साथ? अजित पवारांची साद; काकांची भूमिका वेगळीच! 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसेला महाआघाडीत स्थान नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केलेले असतानाच, अजित पवार यांनी मंगळवारी राज ठाकरे यांना मतविभाजन टाळण्यासाठी सोबत येण्याचे आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे काकांनी फेटाळलेली शक्यता आणि दुसरीकडे दादांनी दिलेले आमंत्रण याला राज आता कसा प्रतिसाद देतात, याकडे राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या मनसेची ताकद पाहता मुंबई-पुणे-ठाणे-नाशिक या पट्ट्यातील मतदारसंघात मोठा फरक पडू शकतो. 

 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असली तरी कल्याण, पुणे आणि भिवंडीत मनसेच्या उमेदवारांना एक लाखावर मते मिळाली होती. उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि शिरूर या मतदारसंघांत मनसेने चांगली मते घेतली होती. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही मनसेच्या नऊ उमेदवारांना एकूण ७ लाखांवर मते मिळाली होती. २००९ मधील निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना एकूण १५ लाख मते मिळाली होती. २००९ मध्ये नाशिक आणि ईशान्य मुंबईत मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. 

 

मनसे महाआघाडीत नाही : शरद पवार 
राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज जरी काही प्रश्नांवर आमच्यासोबत दिसत असले तरी ते येत्या निवडणुकीत आमच्यासोबत राहतील असे वाटत नाही, त्यामुळे मनसे महाआघाडीत नसेल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले होते. 

 

मनसेने सोबत यावे : अजित पवार 
लोकसभेत भाजप- शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे. मनसेनेही मागील वेळी एक लाख मते घेतली होती. त्यामुळे मागचे सगळे विसरून, मतविभाजन टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. मनसेने एक-दोन जागांसाठी ताणून धरू नये, हे माझे वैयक्तिक मत आहे. 


मनसे महाआघाडीत आल्यास पुणे-मुंबई-नाशिक पट्ट्यात युतीला फटका 
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाआघाडीत आल्यास मतविभाजन टळून पुणे- नाशिक- मुंबई पट्ट्यात भाजप-शिवसेनेला फटका बसू शकतो. या पट्ट्यातील मतदारसंघांत मनसेची ताकद तुलनेने जास्त आहे. याच पट्ट्यात शिवसेनेचे अनेक बालेकिल्ले आहेत. मनसे महाआघाडीत आल्यास मतविभाजन टळून या किल्ल्यांना सुरुंग लागू शकतो. 

 

विधानसभा निवडणुकीतील पक्षनिहाय मत टक्केवारी 

पक्ष २०१४ २००९
भाजप २७.८ % १४.४ % 
शिवसेना १९.३ % १६.२६ %
काँग्रेस १८.१ % २१.०१ %
रा. काँग्रेस १७.२ % १६.३७%
मनसे ३.०७% ५.७१%

 

आमची मतसंख्या नक्की वाढेल 
२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट होती आणि आता २०१९ मध्ये भाजपसाठी तशी परिस्थिती राहिली नाही. लोकांचा भाजप-सेनेच्या कारभारावर राग आहे. त्यामुळे गतनिवडणुकीच्या तुलनेत आमची मतसंख्या नक्की वाढेल. मनसेच्या या भूमिकेशी काहीशी मिळतीजुळती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचीही आहे. -संदीप देशपांडे, सरचिटणीस, मनसे 
 

बातम्या आणखी आहेत...