आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी करायला हवी - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छ्त्रपती शिवाजी महारांची जयंती आपल्यसाठी एक सण - राज ठाकरे
  • तिथीनुसार येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्षांनी शिवरायांना वंदन केले

औरंगाबाद - गणपती आणि दिवाळीसह आपले इतर कुठलेच सण तारखेनुसार साजरे करत नाहीत. त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंती ही जयंती नसून आपल्यासाठी एक सण आहे. त्यामुळे ती तिथीनुसार साजरी करण्यात आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी करायला हवी असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. औरंगाबाद येथील शिवजयंती सोहळ्यात ते बोलत होते. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आज संध्याकाळची शोभायात्रा देखील तितक्याच उत्साहाने काढण्यात यावी असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान या यात्रेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच कोरोनाविषयी नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही राज ठाकरे म्हणाले. तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मनसे अध्यक्षांनी शिवरायांना वंदन केले.राज्यात हळूहळू पसरणाऱ्या कोरोनाचा फटका शिवजयंतीच्या कार्यक्रमांना बसत आहे. आज औरंगाबादेत होणाऱ्या मनसेच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र असे असले तरी आज शिवजयंतीचा कार्यक्रम होणारच, असा पवित्रा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतला आहे. यासाठी राज ठाकरे औरंगाबादेत दाखल झालेत. आज सकाळी क्रांती चौकातल्या शिवरायांच्या पुतळ्याला राज ठाकरेंनी अभिवादन केले. 

बातम्या आणखी आहेत...