आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंच्या समर्थनार्थ मनसेची निदर्शने 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप करीत लातूर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शहरातील गांधी चौकात निदर्शने केली. राज ठाकरेंवर कारवाई झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. कोहिनूर मिल प्रकरणात अर्थिक अनियमितता आढळून आल्याने ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयाने राज ठाकरे यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. गुरुवारी ही चौकशी होणार असून त्याला राज ठाकरेंना उपस्थित रहावे लागणार आहे. मात्र ईडीची ही नोटीस मनसे कार्यकर्त्यांना रुचलेली नाही. त्यांनी बुधवारी लातूर शहरातील गांधी चौकात निर्दशने करून आपला विरोध नोंदवला आहे. या निदर्शनांमध्ये मनसेचे जिल्हाप्रमुख संतोष नागरगोजेंसह इतर पदाधिकारी सामील झाले होते.

बातम्या आणखी आहेत...