आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ईडीलाच पाठवली नोटीस, कार्यालयाबाहेरील फलक मराठीत लावण्यास सांगितले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कोहिनूर मिल जमीन गैरव्यवहार प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची काल(22 ऑगस्ट) चौकशी झाली. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने नोटीस पाठवून राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार राज यांची जवळपास 9 तास चौकशी झाली. ईडीने नोटीस पाठवल्यानंतर मनसे शांत बसणारी नव्हती. आता मनसेनेही ईडीला नोटीस पाठवली आहे. "महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत, त्यामुळे त्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्या नोटीसची प्रत ईडीला पाठवली", असे मनसेने म्हटले आहे.

ईडीला नोटीस पाठवल्याची माहिती मनसेने ट्विटरद्वारे दिली
याआधी मनसेने दुकानांवरील पाट्या मराठीत हव्या यासाठी मनसेने आंदोलन केले होते. त्यामुळे आता नोटीस पाठवणाऱ्या ईडीलाच मनसेने नोटीस पाठवून, मराठीत फलक लावण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मनसेच्या या नोटीसनंतर ईडी कार्यालयावर मराठीत "अंमलबजावणी संचालनालय" ही अक्षरे झळकणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या ईडी कार्यालयाबाहेर जो फलक आहे, त्यावर हिंदीमध्ये "प्रवर्तन निदेशालय" असे लिहले आहे. तसेच त्याखाली इंग्रजीमध्ये "Enforcement Directorate" असे लिहिले आहे.

कोहिनूरप्रकरणी नऊ तास चौकशी
राज ठाकरे यांची काल सकाळी 11.30 वाजता सुरू झालेली चौकशी रात्री 8.30 वाजेपर्यंत चालली. कितीही चौकशा केल्या, तरी तोंड बंद ठेवणार नाही, ही राज ठाकरे रात्री कार्यकर्त्यांसमोर प्रतिक्रिया दिली.