आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे करणार चिंतन, आज मुंबईत अधिवेशन, राज ठाकरे करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेच्या १३ वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचे पहिलेच महाअधिवेशन गुरुवारी मुंबईत आयोजित केले आहे. या अधिवेशनाला राज्यभरातून हजारो मनसैनिक मुंबईत आले आहेत. हे अधिवेशन भाजपच्या चिंतन बैठकांप्रमाणे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात दिवसभर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून विविध ठरावही मंजूर करण्यात येणार आहेत. तसेच पक्षाचा नवा झेंडा, त्यामागचे उद्दिष्ट्यही राज ठाकरे कार्यकर्त्यांना उलगडून सांगणार असून ते राजकीय भूमिका काय मांडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

मनसेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या महाअधिवेशनाची सुरुवात सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात येणार आहे. या वेळी मनसेचा नवा झेंडा आणि नवी टॅगलाईनही कार्यकर्त्यांसमोर सादर केली जाईल. त्यानंतर शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, पाणी, महिला, सहकार आदी विषयांवर विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, प्रकाश महाजन आणि उत्तर प्रदेशमधून घनश्याम नावाचा वक्ता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच या चर्चासत्रानंतर ठरावही मांडण्यात येणार असून ते मंजूर केले जाणार आहेत.

संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

दरम्यान, मनसे आपल्या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा घेत असल्याचे झेंडे व्हायरल झाले आहेत. याला संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...