Home | Maharashtra | Mumbai | MNS step out from elction

मनसेची लोकसभा निवडणूकीतून माघार, पक्षाकडून प्रसिद्धीपत्रक जारी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 17, 2019, 07:06 PM IST

राज ठाकरेंची काय भुमिका असणार यावर सगळ्यांचे लक्ष

  • MNS step out from elction

    मुंबई- राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्यासंबंधीच प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे.:

    मनसेने गेल्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे यंदा मनसे लोकसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले होते. आता या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा आज केली. 'मनसे यंदाची लोकसभा निवडणूक लढविणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी' असे प्रसिद्धीपत्रक पक्षाचे नेते शिरीष सावंत यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. या पत्रात 'बाकी 19 मार्च 2019 ला बोलूच' असेही पुढे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 19 मार्चला काय होणार, राज ठाकरेंची काय भुमिका असणार यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Trending