आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रनाैटसह 62 सेलिब्रिटींचे बुद्धिजीवींविरोधात मोदींना पत्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जमावाद्वारे हिंसाचारप्रकरणी देशात दोन वेगवेगळ्या गटांनी परस्परांत पत्रयुद्ध छेडल्याचे चित्र आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या काही तास आधी ६२ सेलिब्रिटी, बुद्धिजीवी तथा मान्यवर व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र पाठवले. त्यात ४९ बुद्धिजीवींच्या गटाने पाठवलेले पत्र राजकारणाने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. हा केवळ निवडक गटाचा आक्रोश असल्याची टीका पत्रातून करण्यात आली आहे. 


काश्मीरमध्ये फुटीरवाद्यांनी शाळा बंद केल्या तेव्हा हे लोक कोठे होते ? जेएनयूमध्ये घोषणाबाजी झाली होती त्यावर देशातील या गटाने आपला मुद्दा का मांडला नव्हता ? काश्मिरात दहशतवादी हिंसाचार व नक्षलींकडून गरिबांवर अत्याचार होतो, त्याच्याविरोधात ही बुद्धिजीवी मंडळी पत्र का लिहीत नाहीत ? पत्र लिहिणारे हे ४९ जण देशाचे ‘स्वयंभू गार्डियन’ आहेत, अशी टीकाही या पत्रातून करण्यात आली आहे. या पत्रावर गीतकार प्रसून जोशी, अभिनेत्री कंगना रनौट, चित्रपट निर्माता मधुर भांडारकर यांच्यासह ६२ कलाकार, सेलिब्रिटींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


तत्पूर्वी कला, साहित्य व इतर क्षेत्रांतील ४९ व्यक्तींनी २३ जुलै रोजी पंतप्रधानांच्या नावे खुले पत्र लिहिले होते. त्यात मुस्लिम, मागासवर्गीय व इतर समुदायाच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचाराला रोखण्याची मागणी करण्यात आली होती. त्या पत्रात अपर्णा सेन, कोंकणा सेन-शर्मा, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप, शुभा मुद॰गल इत्यादी अनेक दिग्गज कलाकारांची स्वाक्षरी होती. सरकारने पत्राद्वारे लावण्यात आलेल्या आरोपांना फेटाळून लावले होते. 

बातम्या आणखी आहेत...