आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mob Lynching Scene In 'Sacred Games 2' Is Creating Controversy, Director Replies To Trollers

'सॅक्रेड गेम्स-2' मधील मॉब लिंचिंग सीनमुळे होत आहे नीरज घेवाण याची निंदा, दिग्दर्शकाने ट्रोलर्सला दिले उत्तर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : वेब सीरीज 'सॅक्रेड गेम्स' च्या दुसऱ्या सीजनमध्ये दाखवल्या गेलेल्या लिंचिंग सीनमुळे वाद सुरु झाला आहे. सीरीजच्या एका एपिसोडमध्ये जमावाने एका मुस्लिम मुलाला मारल्याचे दृश्य दाखवेल गेले आहे. एका प्रसिद्ध ट्विटर अकाउंट गब्बर सिंहने हा सीन केवळ आयटम नंबर असल्याचे सांगितले जात आहे. यूजर म्हणाला की, या सीनचा वेब सीरीजच्या कथेशी काहीही संबंध नाही. सीरीजचा डायरेक्टर नीरज घेवाणने यूजरला उत्तर दिले. तो म्हणाला की, जेव्हा वास्तविकतेत लिंचिंगची एखादी घटना घडते, तेव्हा एकही कणखर ट्वीट नाही करत. 
 

 

ट्विटरवर दिले उत्तर... 
गब्बर सिंहने नीरजला टॅग करत लिहिले, 'इतर डायरेक्टर आपल्या चित्रपटात आयटम नंबर ठेवतात, ज्याचा कथेशी काहीही संबंध नसतो. अनुराग कश्यपने आपल्या शोमध्ये मॉब लिंचिंगचा सीन ठेवला, ज्याचा कथेशी काहीही संबंध नाही.' 
 
मात्र हा सीन सरताज सिंहच्या स्टोरी लाइनसोबत शूट केला गेला होता. जे या सीजनमध्ये घेवाण डायरेक्ट करत आहे. अनुराग कश्यप केवळ गणेश गायतोंडेच्या स्टोरी लाइनचे दिग्दर्शन करतो. 
 

 

नीरज घेवाणने दिले उत्तर... 
नीरजने ट्वीटचे उत्तर दिले. 'जेव्हा कुठे सत्यात मॉब लिंचिंग होते, तेव्हा तुमच्याकडे एकही कणखर ट्वीट करण्याची हिंमत नसते. आता तुम्हाला कथा समजली नाही ही तुमची कमतरता लपवण्यासाठी ग्लोबल प्लॅटफॉर्मवर याची तुलना आयटम नंबरसोबत करत आहात. आश्चर्यकारक.'
 

 

वेदना होतात असे केल्याने... 
नीरजने पुढे लिहिले, 'मी लिंचिंग सीनचे दिग्दर्शन केले आहे. निश्चितचा तुम्ही हे म्हणू शकता की, तुम्हाला हे योग्य वाटले नाही किंवा मग तुम्हाला हे कळले नाही. तुम्हाला हा अंदाज नाहीये की, आपल्या खऱ्या नावासोबत अशा गोष्टी करणे किती कठीण असते आणि जेव्हा तुम्ही आयटम नंबरसारख्या तुच्छ गोष्टींशी तुलना करून याची निंदा करता तेव्हा खूप त्रास होतो.  
 

 

यूजरने लिहिले, 'मलाही दुःख झाले... '
नीरजच्या या ट्वीटनंतर गब्बर सिंहने लिहिले, 'मी त्या सर्व प्रयत्नांचे कौतुक करतो जे तुम्ही केले आहेत. मला त्रासही कळतो आहे. जर तुम्हाला वाटते की, ही निंदा अयोग्य आहे, तर हे एखाद्याच्या लहान मुलाला शिवी देण्यासारखे आहे. पण माझ्यावर लिंचिंग सपोर्टर असण्याचा किंवा 'साहसी' असल्याचा आरोप लावून तुम्ही बोलायला सुरुवात केली, याचेही दुःख होते आहे.' 
 

  या ट्वीटनंतर नीरजने लिहिले, 'अच्छा! आता तुला कळेल की, कसे वाटते, जेव्हा अनेक फालोअर्स असलेली एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल चुकीचे ट्वीट करते.' 

बातम्या आणखी आहेत...