आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉब लिंचींग / बिहारमध्ये जनावरे चोरी केल्याच्या संशयात तीन तरुणांना बेदम मारहाण, दोघांचा जागीच मृत्यू तर एकाने उपचारादरम्यान सोडला श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारण(बिहार)- जिल्ह्यात गुरुवारी रात्री गावकऱ्यांनी तीन तीन तरुणांची बेदम मारहाण करून हत्या केली. त्या तरुणांवर पाळीव जनावरे चोरण्याचा आरोप गावकऱ्यांनी लावला आहे. हे तीन तरुण गावात आले असता, गावकऱ्यांनी त्यांना पकडले आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान तिसऱ्याचा मृत्यू झाला. 

 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, मॉब लिंचींगची ही घटना बनियापूरच्या पिठोरी नंदलाल गावात घडली. मृत राजू नट, विदेशी नट आणि नौशाद कुरैशी शेजारील गावचे रहिवासी होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी जोरदार प्रदर्शन केले,  ते चोर नव्हते, कट रचून त्यांना मारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रदर्शनदरम्यान नागरिकांनी पोलिसांसोबत बाचाबाची झाली, त्यानंतर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला.


हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी सुरू केला तपास
एसपी हरी किशोर राय यांनी सांगितले की, प्राथमिक तपासास असे समोर आले आहे की, ते तीनही तरुण गावातील जनावरे चोरी करण्यासाठी आले होते. त्यांच्या गाडीतून एक म्हैस सापडली आहे. डीएसपींच्या नेतृत्वात पोलिस टीम आरोपींना पकडण्यासाठी सर्वत्र चौकशी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...