आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ; मोबाईल आणि रोख रक्कम केली लंपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक - नाशिक येथील आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यात चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कमेवर हात साफ केला. दरम्यान याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. बिलाल खान आणि विठ्ठल जाधव अशी दोघांची नावे आहेत. 

 
मेळाव्यात चोर आपल्या खिशातील पैसे चोरत असल्याचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांच्या लक्षात आले. त्यांनी चोराला रंगेहात पकडले आणि अंबड पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरील घटना समोर आल्यानंतर आणखीन चार ते पाच जणांचे मोबाईल आणि रोख रक्कम चोरल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...