आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिचार्जसाठी आग्रह करून मोबाइल कंपन्या करतात ग्राहकांची फसवणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- नुकत्याच विविध सिमकार्ड कंपन्यांकडून मोबाइलवर संदेश येत आहेत. दरमहा कमीत कमी रुपये ३५ रूपयांचा रिचार्ज मारणे अथवा मोबाइल क्रमांक बंद होईल, असा इशारा देण्यात आला. बहुतांश ग्राहकांचे मोबाइल आजपासून बंद पडायला सुरूवात झाली. ग्राहकाला पुरता नागवला जात असून, सर्व कंपन्यांनी रचलेला हा ग्राहकांच्या फसवणुकीच्या कटाचा भाग असल्याचा आरोप ग्राहक प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. 

 

सिमकार्ड कंपन्यानी आता ग्राहकांनी आपल्या मोबाइलमध्ये ३५ रुपयांचा रिचार्ज केल्याशिवाय मोबाइल क्रमांक चालू राहणार नाही, असा गर्भीत इशारा दिला आहे. ग्राहकांवर हा अतिरिक्त भुर्दंड असून, विविध कंपन्याकडे दरमहा करोडो रूपये ह्या माध्यमातून जमा होणार आहे. ही रक्कम काय करणार पूर्वी कमीत कमी १० रूपयांचे रिचार्ज मारले जात होते. पण आता ते शक्य नाही. काही सिमकार्ड कंपन्यांनी ग्राहकांच्या मोबाइल वरील येणारे कॉल्स बंद का केले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ह्या बाबत नीरज गुरनुले रा उमरी ह्यांनी ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या बाबत ग्राहक प्रहार संघटनेने केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांकडे तक्रार नोंदवली असून, सरकारने दखल न घेतल्यास विविध सिमकार्ड कंपन्यांचा प्रतिकृतीची होळी करू असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर डॉ. रमेश काळे, प्रसाद नावलेकर, बंडू लवटे, भैय्यासाहेब ठमके, दामुसेठ बाजोरिया, प्रदीप भानारकर, सचिन मेश्राम, राजेश पामपट्टीवार, मनोज अग्रवाल, शेख सत्तार शेख रज्जाक, सुधीर जावदे, कृतांजय देशपांडे आदी अनेकांच्या सह्या आहेत.