आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलपासून मोबाइल महाग; जीएसटी १२ वरून १८ टक्के, जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेतला निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टेक्स्टाइल, खते आणि पादत्राणांवरील करांबाबत निर्णय पुढील बैठकीत होईल
  • दर ठरवणे कंपन्यांचे काम : अर्थमंत्री

नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कर कौन्सिलने मोबाइल फोनवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के केला आहे. तो १ एप्रिल २०२० पासून लागू होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जीएसटी कौन्सिलच्या ३९ व्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. टेक्स्टाइल, खते आणि पादत्राणांवरील करांबाबत निर्णय पुढील बैठकीत होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, माेबाइल फोन, टेक्सटाइल, खते व पादत्राणांपासून जितका जीएसटी महसूल मिळत आहे, त्यापेक्षा जास्त इनपुट टॅक्स क्रेडिटची मागणी येत आहे. त्याकडे बघता या उत्पादनांवरील जीएसटी तर्कसंगत करण्यासाठी चर्चा करण्यात आली. तथापि, फक्त माेबाइल फोन व त्याच्या काही विशिष्ट सुट्या भागांवरील जीएसटीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  दर ठरवणे कंपन्यांचे काम : अर्थमंत्री

करवाढीमुळे मोबाइल महागतील. याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, मोबाइल फोनच्या दरवाढीचा निर्णय कंपन्यांना घ्यायचा आहे. मात्र जेव्हा आयटीसी रिफंड अडकलेला असताना त्यामुळे कंपन्यांचेच नुकसान हाेत आहे. कंपन्या याची भरपाई ग्राहकांच्या खिशातूनच वसूल करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...