आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरच्या पाच जिल्ह्यांत पुन्हा मोबाइल इंटरनेट बंद; खोऱ्यात निदर्शने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर/ नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या जम्मू भागातील पाच जिल्ह्यांत रविवारी टूजी माेबाइल इंटरनेट सेवा एकाच दिवसात पुन्हा बंद करण्यात आली.
 
प्रशासनानुसार, फेक न्यूज व अफवा राेखण्यासाठी जम्मू, सांबा, कठुआ, रियासी आणि उधमपूरमध्ये माेबाइल इंटरनेट बंद केले. प्रशासनाने सांगितले की, काही भागात ही सेवा सुरू आहे. राज्यातील ३५ पाेलिस ठाणे क्षेत्रांत शुक्रवारी सायंकाळीच निर्बंध हटवले हाेते आणि ५० हजार लँडलाइनसह टूजी माेबाइल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू केली हाेती. यानंतर श्रीनगरसह खाेऱ्यात १२ ठिकाणी युवक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली हाेती. त्यात अनेक जखमी झाले. प्रशासनाने श्रीनगरच्या काही भागात पुन्हा कठाेर निर्बंध लावले आहेत. हजला गेलेल्या राज्यातील ३०० हाजींच्या पहिला जथ्थ्याला त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी सरकारी बस उपलब्ध केल्या आहेत. राज्यात ४ आॅगस्टच्या रात्री लँडलाइन, माेबाइल, इंटरनेट सेवा बंद केली हाेती आणि शुक्रवारी रात्री ती पुन्हा सुरू झाली हाेती.
 

अतिरेक्यांना एकटे पाडण्यावर भर 
पाेलिस महासंचालक दिलबागसिंग यांनी सांगितले की, पाेलिस अतिरेक्यांना एकटे पाडण्याच्या माेहिमेत गुंतले आहेत. लाेकांची दिशाभूल करणाऱ्या अतिरेक्यांना माेकळीक मिळणार नाही. दिलबाग यांनी रविवारी कायदा-सुव्यवस्थेतील अधिकारी व सुरक्षा दलांसाेबत बैठक घेतली.
 

आता चर्चा फक्त पाक व्याप्त काश्मीरवरच : राजनाथ
 

लष्कराच्या दोन माजी अधिकाऱ्यांची ३७० वर याचिका 
कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयास लष्करातील दाेन निवृत्त अधिकाऱ्यांसह इतरांनी सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नव्या याचिका जम्मू-काश्मीर केडरचे निवृत्त आयएएस हिंदाल हैदर तय्यबजी, निवृत्त एअरव्हाइस मार्शल कपिल काक, निवृत्त मेजर जनरल अशाेककुमार मेहता आदींनी दाखल केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...