आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चित्तौडगड : राजस्थानच्या चित्तौडगडमध्ये मोबाइल ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 60 वर्षीय किशोर सिंह जखमी झाले आहेत. किशोर आपल्यासोबत मोबाइल घेऊन झोपले होते. रात्री 2.30 वाजचा त्यांचा डोळा उघडला आणि अचानक मोबाइलचा स्फोट झाला. यामुळे त्यांच्या शरीराला आग लागली होती. त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले पण तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मोबाइल फुटल्याने एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. सध्या अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत. अनेकवेळा आपल्या चुकांमुळे हा धोका वाढत असतो. अशातच आम्ही तुम्हाला अशा 10 गोष्टी सांगत आहोत ज्या आपण फोन वापरताना टाळाव्यात.
10 सेफ्टी Tips
1. कधीही फोन उशीखाली घेऊन झोपू नये. यामुळे मोबाइलचे तापमान वाढते आणि त्यामुळे त्यावर प्रेशर निर्माण होते. यामुळे उष्णता वाढण्याची शक्यता असते.
2. मोबाइलला शर्ट किंवा स्वेटरच्या वरच्या खिशात ठेवू नये. यामुळे रेडिएशनचा धोका असतो. सोबतच शर्ट आणि स्वेटरमध्ये आग लवकर पसरत असते.
3.फोन रात्रभर चार्जिंग लावून सोडू नका.
4.आग पकडणाऱ्या गोष्टी मोबाइल चार्जिंगला लावलेला असताना त्याच्याजवळ ठेवू नये. जसे की, कपडे किंवा बेडशीट
5. डुप्लीकेट चार्जर आणि अॅडॅप्टरचा वापर करू नये.
6.डुप्लीकेट बॅटरी कधीही वापरू नका. कारण त्या बॅटरीचा कधीही स्फोट होत असतो. यामुळे नेहमीच कंपनीच्या बॅटरीचा वापर करावा.
7. गाडीच्या डॅशबोर्ड किंवी सूर्यांची किरणे थेट पोहचणाऱ्या ठिकाणी मोबाइल चार्जिंगला ठेवू नका.
8. मोबाइल कवर किंवा मोबाइल केस काढूनच फोनला चार्जिंगसाठी लावावा.
9.फोनमध्ये काही प्रॉब्लेम आल्यास थेट ऑथराइज्ड सेंटर्सवर दुरूस्त करा. लोकल दुकानांना टाळा.
10. फोन गरम होत असेल तर त्याला चार्ज करू नका.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.