आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनल मेमरी फुल झाल्याने हँग होतो Smartphone? इतकी सोपी आहे वाढवण्याची Trick

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - मार्केटमध्ये सध्या 64GB इंटरनल मेमरी असलेल्या फोनची चलती आहे. अशात आपण आजही 4जीबी किंवा 8जीबी मेमरी असलेले Android फोन वापरत असाल तर साहजिकच फोन हँग होण्याच्या समस्येला वैतगाला आहात. असे फोन वापरताना वारंवार लो इंटरनल मेमरीच्या समस्येला सामोरे जात असाल तर ही ट्रिक फक्त आपल्यासाठीच आहे. यामध्ये आपल्याला स्मार्टफोनमध्ये काही सोप्या सेटिंग्स कराव्या लागतील. विशेष म्हणजे, ही सेटिंग करण्यासाठी आपल्याला कुठलाही अॅप इंस्टॉल करावा लागणार नाही. तर कशी आहे ही सेटिंग हे आपण पाहूया...


इंटरनल मेमरी वाढवणारी ट्रिक
या सिंपल हॅकमध्ये आपल्या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी भरल्यास आपण SD कार्डची मेमरी इंटरनलमध्ये मर्ज करू शकता. फोनची इंटरनल मेमरी 4 जीबी असेल तर 32 जीबीचा मेमरी कार्ड टाकून आणि काही सेटिंग करून फोनची इंटरनल मेमरी 36 जीबीपर्यंत वाढवता येईल.


मिळेल हा फायदा
फेसबूक आणि व्हॉट्सअॅपसह अनेक अॅप्स आहेत ज्या बॅकराउंडमध्ये रन होत असताना आपल्या फोनची इंटरनल मेमरी खातात. इंस्टॉल होत असताना सुद्धा त्यांना इंटरनल मेमरीच लागते. ते मेमरी कार्डमध्ये इंस्टॉल होत नाहीत. सोबतच, कुठलीही सेटिंग करून ते मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर करता येत नाही. त्यामुळे, पुढील एक ट्रिक आपल्याला फायद्याची ठरेल.


इंटरनल मेमरी वाढवण्याची प्रक्रिया...
1. सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये जाऊन Storage वर टच करा.
2. Storage वर क्लिक केल्यानंतर आपल्याला Portable Storage असे ऑपशन दिसेल. त्याला टॅप करा.
3. आता नवीन पेज ओपन होईल. येथे सर्वात वर दिसणाऱ्या 3 डॉट्सला टच करा. आता दुसरे Settings ऑप्शन दिसेल. त्याला क्लिक करून ओपन करा.
4. Settings मध्ये गेल्यानंतर Format as internal वर टच करा. आता Erase & Format वर टच करा आणि पुढील प्रक्रिया फॉलो करत जा.
5. प्रोसेस पूर्ण होण्यासाठी किमान 5 मिनिटे लागू शकतात. यानंतर फोनची इंटरनल मेमरी आणि मेमरी कार्ड मर्ज होतील. तसेच SD कार्डची मेमरी आता फोनची इंटरनल मेमरी झालेली असेल.


नोट : या प्रक्रियेत आपल्या फोनचा डेटा डिलीट होऊ शकतो. त्यामुळे, प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी डेटा बॅक-अप करून घ्यावे.

बातम्या आणखी आहेत...