• Home
  • Business
  • Mobile phone help to save water, rajasthani youth creates a device

Device / आता मोबाइल करणार पाणी वाचवण्यास मदत, राजस्थानच्या तरुणाने तयार केले असे डिव्हाइस

केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्याकडून युवकाचे कौतुक

दिव्य मराठी

Jul 22,2019 06:45:51 PM IST

गॅजेट डेस्क - तुम्ही घराच्या बाहेर असाल आणि पाणी येण्याची वेळ झाली असेल तर काळजी करायची आवश्यकता नाही. कारण नळाला पाणी येताच तुमच्या मोबाइलवर याची माहिती मिळेल. नळाला पाणी आल्यानंतर तुमच्या मोबाइलवर फोन येतो. फोन उचलताच तुमच्या घरावर लावलेल्या टाकीत पाण्याचा सप्लाय सोडण्यात येईल. तुम्हाला जर वाटले की, पाण्याची टाकी भरली आहे तर तुम्ही त्याच क्रमांकावर फोन करून पाण्याचा सप्लाय बंद करता येईल.


> राजस्थानातील एका छोट्याशा गावातील कमल किशोर सोळंकीने असे डिव्हाइत तयार केले ज्यामुळे पाणी आल्यावर आणि गेल्यावर इतडे-तिकडे धावपळ करावी लागणार नाही. नळाला पाणी येताच डिव्हाइसच्या माध्यमातून तुमच्या मोबाइलवर फोन येईल. फोन उचलताच घरावरील पाण्याच्या टाकीत सप्लाय सुरु होईल. तुम्हाला जर वाटले टाकी भरली आहे तर तेच क्रमांक डायल केल्यानंतर पाण्याचा सप्लाय आपोआप बंद होईल.


> हे डिव्हाइस फक्त 900 रुपयांत तयार करण्यात आले आहे. यामध्ये सेंसर आणि एक गिअर बॉक्स लावण्यात आला आहे. राजस्थानात पाण्याची बचत करण्यासाठी हे डिव्हाइस उपयुक्त ठरणार असल्याचे नंदकिशोर सोळंकीने सांगितले.

> केंद्रीयमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी नंदकिशोरचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, असे डिव्हाइस प्रत्येक घरात बसवल्यास राजस्थानच नाही तर संपूर्ण देशात व्यर्थ वाहणाऱ्या पाण्याची बचत करता येऊ शकते.

विहिरीमध्ये होतो अशा डिव्हाइसचा उपयोग
शेतातील विहिरी आणि बोअरवेलमध्ये अशा प्रकारच्या डिव्हाइसचा उपयोग होतो. या डिव्हाइसमुळे वीज आल्यानंतर तुमच्या मोबाइलवर माहिती मिळते आणि शेतकरी घरबसल्या विहिरीवरील पंप सुरु करू शकतात. उत्तर प्रदेश, हरियाणासह अनेक राज्यांत अशा डिव्हाइसचा उपयोग करत आहेत.

X