Home | Business | Industries | mobile portibilty service

मोबाईल पोर्टेबिलिटीला चांगला प्रतिसाद- एक कोटी ग्राहकांनी बदलली सेवा

agency | Update - May 30, 2011, 08:54 PM IST

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचा सेवेला चार-पाच महिने झाले असून याकाळात आतापर्यंत मोबाइल फोन सेवा पुरविणारी कंपनी बदलणाऱ्यांची संख्या १ कोटीच्या पुढे गेली आहे. दूरसंचार क्षेत्राची नियामक संस्था असलेल्या 'टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया'ने ('ट्राय') चांगला प्रतिसाद मिळाल्याचे म्हटले आहे.

  • mobile portibilty service

    mnp_258_03मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचा (एमअनपी) सेवेला चार-पाच महिने झाले असून याकाळात आतापर्यंत मोबाइल फोन सेवा पुरविणारी कंपनी बदलणाऱ्यांची संख्या १ कोटीच्या पुढे गेली आहे. दूरसंचार क्षेत्राची नियामक संस्था असलेल्या 'टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया'ने ('ट्राय') चांगला प्रतिसाद मिळाल्याचे म्हटले आहे.

    ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी 'ट्राय'ने 'एमएनपी'ची सेवा सुरू केली. या सेवेअंतर्गत ग्राहक आपल्या मोबाइल कंपनीची सेवा बंद करुन दुसऱ्या कंपनीची सेवा मोबाइल क्रमांक न बदलता घेऊ शकतो. या 'एमएनपी'चा फायदा 'व्होडाफोन'ला सर्वात जास्त झाला असून, याअंतर्गत कंपनीने सुमारे ६ लाख नवे ग्राहक मिळविले आहेत. 'आयडिया' ने त्याखालोखाल ५ लाख ९० हजार ग्राहक आपल्या सेवेकडे खोचले आहेत. 'एअरटेल' कंपनी तिसऱ्या स्थानावर असून, तिने ५ लाख ६३ हजार ग्राहक मिळविले.'एमएनपी'चा लाभ घेणे हे 'ब्रँड'बद्दल असणारा दृष्टिकोन आणि जागरूकता यावर आधारित असल्याचे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. 'व्होडाफोन' व 'आयडिया'ने आपली प्रचारमोहीम उत्तम राबविली. त्यामुळे कंपनी नवे ग्राहक खेचण्यात यशस्वी झाली. मोबाइल 'नंबर पोर्टेबिलिटी'चा वापर दीड-दोन टक्क्यांपेक्षा कमी ग्राहकांनी केला आहे.Trending