Home | Business | Industries | mobile recharge now in only one rupees

आता मोबाईल रिचार्ज होणार एका रुपयात

agency | Update - May 28, 2011, 03:45 PM IST

आपण कधी आपला मोबाईल एक किंवा दोन रुपयांत रिचार्ज केला आहे. याचे उत्तर सर्वजण नाही असेच देतील.

  • mobile recharge now in only one rupees

    आपण कधी आपला मोबाईल एक किंवा दोन रुपयांत रिचार्ज केला आहे. याचे उत्तर सर्वजण नाही असेच देतील. किंवा एक-दोन रुपयांत कुठे मोबाईल रिचार्ज होतो का असा प्रश्न मनाला विचाराल. पण खरंच या प्रश्नाचे उत्तर व्होडाफोन कंपनीने दिले असून त्यांनी महाराष्ट्र व गोवा या विभागासाठी चक्क अशी सेवा सुरु केली आहे. या योजनेनुसार तुम्ही अगदी एक-दोन रुपयांचे रिचार्ज करु शकणार आहे.
    मात्र यासाठी आपल्याला सर्वसाधारण टॉकटॉइमच्या ऐवजी एक वेगळी स्पेशल ऑफर दिली जाईल. एक रुपयाच्या रिचार्जवर आपल्याला रात्री ११ ते सकाळी ८ यावेळेत (एक दिवसासाठी) व्होडाफोन टू व्होडाफोन दहा लोकल कॉल करु शकता. दोन रुपयांच्या रिचार्जवर एका दिवसात ८ एसएमएस (नॅशनल किंवा लोकल) करु शकता.

Trending