आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांनी मोबाइल ओढला; रेल्वेतून पडून तरुण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या भोईटेनगर रेल्वेगेट परिसरात रेल्वेची गती कमी असताना भामट्यांनी दरवाजात बसलेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यात तो तरुण रेल्वेतून खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाला. रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता ही घटना घडली. 


पीयूष राजेश पाटील (वय २२, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीयूष हा धरणगाव येथे नातेवाइकांकडे आला होता. रविवारी सायंकाळी लष्कर एक्स्प्रेसने तो पुन्हा नाशिक जाण्यासाठी निघाला. गर्दी असल्यामुळे तो दरवाजाजवळ बसला होता. जळगाव स्थानकावरून रेल्वे निघाल्यानंतर भोईटेनगर रेल्वेगेट परिसरात रेल्वे रुळाजवळ उभ्या असलेल्या भामट्यांनी त्याच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यात तोल जाऊन तो थेट खाली पडला.

 

रेल्वेची गती कमी असल्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले. या घटनेनंतर भामटे त्याच्या हातातील अाठ हजार रुपयांचा मोबाइल घेऊन पसार झाले. तर नागरिकांनी पीयूष याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगाव रेल्वेस्थानक परिसरात नेहमीच अशा घटना घडत असतात. परंतु, याप्रकरणी अद्यापपर्यंत संशयिताना अटक करण्यात आलेली नाही. गतवर्षी अशाच एका घटनेत एका प्रवासी तरुणाचा मृत्यू झाला होता. 
 

बातम्या आणखी आहेत...