आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झटका मारून मोबाइल लंपास करणारा चोरटा पोलिसांनी केला अखेर गजाआड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शिकवणी वर्गाला जाणाऱ्या एका विद्यार्थ्याचा पंधरा हजार रुपयांचा मोबाइल दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी पळवल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात सायबर ठाण्याच्या पोलिसांनी गुरूवारी (दि. १०) वडाळी परिसरातून एका चोरट्याला अटक केली आहे. 


सुरज सुधीर तायडे (२१ रा. प्रबुद्धनगर, वडाळी) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विश्वशीला कॉलनीमध्ये राहणाऱ्या ऋषिकेश एकनाथ लडके २५ डिसेंबर २०१८ ला त्याच्या मित्रासोबत सायकलने राठीनगरमध्ये शिकवणी वर्गासाठी जात होता. याचवेळी मार्गात चोरट्याने दुचाकीवरून येऊन ऋषिकेशचा मोबाइल झटका मारून लंपास केला होता. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 

 

दरम्यान सायबर पाेलिस ठाण्याच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला असता सुरज तायडेचा सहभाग आढळला. त्यामुळे पोलिस पथकाने त्याला अटक केली असता सदर गुन्हा एका मित्राच्या मदतीने केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. आरोपीने गुन्हा करतेवेळी वापरलेली दुचाकी तसेच चोरीला गेलेला मोबाइल जप्त करून गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात दिला. या प्रकरणाचा तपास पीएसआय बालाजी पुंड करत आहे. ही कारवाई सायबर ठाण्याचे ठाणेदार अनिल कुरळकर, एपीआय कांचन पांडे, पीएसआय ईश्वर वर्गे, सैय्यद ताहेर अली, सुधीर चर्जन, गजानन पवार, सचिन भोयर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...