आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल लांबवणाऱ्या तिघांना चोप, पळाल्यानंतर केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रेल्वेस्थानक परिसरात पादचाऱ्यांचा मोबाइल घेऊन पळून जाणाऱ्या तिघांना जमावाने पकडून चोप दिला. जमावाच्या तावडीतून तिघे पळून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दोघांना अटक केली. मंगळवारी रात्री १२.१५ वाजता ही घटना घडली. 


नितीन गणेश पाठक (वय ४८, रा.श्रीराम कॉलनी, धुळे) हे मंगळवारी रात्री १२.१५ वाजता स्टेशन रोडने पायी जात होते. मोहसीन शेख हानिफ (वय २१, रा. मास्टर कॉलनी), जुबेर शेख हुसनोद्दीन (वय २२, रा.शिवाजीनगर) व एक अल्पवयीन असे तिघे भामटे दुचाकीने (एमएच- १९, बीव्ही- ७३६४) मागून आले. त्यांनी पाठक यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला.

 

नागरिकांनी तिघांना पकडून चोप दिला. जमावाच्या तावडीतून सुटून दुचाकी सोडून ते पळून गेले होते. पाठक यांनी शहर पोलिस गाठून घटनाक्रम सांगितला. त्यानुसार जबरी लुटीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी दुचाकी जप्त करून संशयितांचा शोध घेतला. विजयसिंग पाटील, वासुदेव सोनवणे, प्रीतम पाटील, गणेश पाटील यांच्या पथकाने दुपारी १ वाजता मोहसीन व एक अल्पवयीन भामट्यास पकडून आणले. तर जुबेर बेपत्ता झाला होता. त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. 


दुचाकी जुबेरच्या भावाच्या मालकाची

जुबेर मंगळवारी रात्री मद्यधंुद झाला होता. त्याच्या भावाच्या मालकाची दुचाकी त्याने ताब्यात घेतली होती. याच दुचाकीवर मोहसीन व एक अल्पवयीन भामट्याला सोबत घेऊन तिघांनी पाठक यांचा मोबाइल हिसकावला. 


२ महिन्यांपूर्वीच जामीन 
गेल्या वर्षी नंदुरबारकडून भुसावळला जाणाऱ्या धावत्या रेल्वेगाडीत प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटले होते. या गुन्ह्यात जुबेर व मोहसीन या दोघांना अटक करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वीच दोघे जामिनावर मुक्त झाले आहे. त्यानंतर पुन्हा दोघांनी जबरी लुटीचा प्रयत्न केला. 

बातम्या आणखी आहेत...