आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल, कपडे, बूट, चप्पल एक एप्रिलपासून महागणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची आगामी बैठक शनिवारी, १४ मार्च रोजी होत आहे. या बैठकीत मोबाइल फोनवरील जीएसटीचा दर १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आधीच मोबाइल पार्ट्सचा पुरवठा घटल्याने मोबाइल उद्योग संकटात सापडला आहे. त्यात मोबाइल उपकरणांमध्ये दरवाढ झाल्यास उद्योगाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोबाइल फोनव्यतिरिक्त बूट,चप्पल आणि कपडे यांच्या विद्यमान दरांमध्येही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बैठकीत जीएसटी रिटर्न फाइल करण्याची व्यवस्था तसेच ई-इन्व्हाइसची प्रक्रिया बंद केली जाण्याबद्दल विचारविनिमय अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे जीएसटी नोंदणीकृत करदात्यांच्या आधारे सत्यापन करण्याबाबत काय तयारी झाली यावरही चर्चा होणार आहे. जीएसटीअंतर्गत लॉटरी योजनेवरही या बैठकीत विचार होणार अाहे. हे सर्व बदल नव्या आर्थिक वर्षात म्हणजे १ एप्रिलपासून लागू करण्याचे प्रस्तावित आहे.

बातम्या आणखी आहेत...