आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड मॉडेल विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण...भाजपचे आशिष शेलार यांच्या बंधूंना दिलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्याचे आमिष देऊन मॉडेलचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू आणि माजी नगरसेवक विनोद शेलार यांना दिलासा मिळाला आहे. एका मॉडेलने विनोद शेलार यांच्या विनयभंगाचा आरोप केला होता. परंतु विनोद शेलार यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या मॉडेलने आपण विनोद शेलार यांना ओळखतच नसल्याचे म्हटले आहे. तसेच विनयभंगाच्या संदर्भात व्हायरल झालेला व्हिडीओ बनावट आणि स्क्रीप्टेड होता, असेही मॉडेलने म्हटले आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

ऑगस्ट 2018 मध्ये विनोद शेलार यांच्यावर एका मॉडेलने विनयभंगाचा आरोप केला होता. त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनुसार, विनोद शेलार यांनी मालाडमधील दहीहंडी कार्यक्रमात आपला विनयभंग केला, असा आरोप संबंधित मॉडेलने केला होता.मात्र, हा व्हिडीओ पत्रकार फ्लॅन रेडियन्स यांनी विनोद शेलारांचे राजकीय स्पर्धक ब्रिजेश सिंह यांच्या सांगण्यावरुन बनवल्याचे पोलिसांच्या चार्जशीटमधून समोर आले आहे. हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचे आता मॉडेलने म्हटले आहे. विनोद शेलार यांच्याविरोधात बदनामीचा कट रचणाऱ्या ब्रिजेश सिंह आणि पत्रकार फ्लॅन रेडियन्स यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ब्रिजेश सिंह यांच्या सांगण्यावरुन व्हिडिओ केल्याचा आरोप आहे. विनोद शेलार यांना ब्लॅकमेल केल्यास बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवून देऊ, असे आमिष मॉडेलला दाखवले होते. मॉडेलने पोलिसांना दिलेल्या जबाबातून हा सर्व प्रकार समोर आला.

बातम्या आणखी आहेत...