आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलने Share केला फ्लाइटच्या फर्स्ट क्लास कॅबिनचा फोटो, या एका चुकीने झाली ट्रोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनची इंस्टाग्राम स्टार मॉडेल हरिमाओ ली नुकतेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून ट्रोल झाली आहे. काही भडकलेल्या सोशल मीडिया यूझर्सने तर तिच्यावर आपला रोष देखील व्यक्त केला. आपल्या चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी या मॉडेलने एका फ्लाइटमध्ये प्रवास करतानाचा फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहताच लोकांना तिची चूक लक्षात आली. यानंतर थट्टा मस्करी करणारे यूझर्स तिच्यावर तुटून पडले. काहींनी तर तिला शिवराळ भाषेत ही लोकांना वेड्यात काढत आहे असे म्हटले आहे. 


असे आहे प्रकरण...
गेल्या महिन्यातच मॉडेल हरिमाओने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आपण एका फ्लाइटमध्ये बिझनेस क्लासने प्रवास करत आहोत असे तिने दाखवण्याचा प्रयत्न केला. सोबतच हातात वाईनचा ग्लास घेऊन पोझ दिल्या.  हरिमाओने या फोटोला कॅप्शन दिले, की 30 हजार फूटांवर हाँगकाँग ते रोम जाताना आपल्या चारही बाजूंनी सुंदर असा प्रकाश पसरलेला असतो. हा फोटो पाहताच लोक भडकले. त्यांनी फोटोतील चूक लक्षात घेऊन आम्हाला काय मूर्ख समजले आहे का? असा जाब विचारला. कोणत्या फ्लाइटमध्ये तुला लाइटिंग घेऊन प्रवास करता येत आहे. दुसऱ्या एकाने लिहिले, की प्रसिद्धीसाठी तू इतकी नौटंकी करशील याचा विचार केला नव्हता.


ही कसली बिझनेस क्लास फ्लाइट...
दुसऱ्या एका यूझरने लिहिले, की वा हा तर गजबच झाला. तू एका बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत आहेस, आणि तुझ्यावर ही लायटिंग कुठून आली बरं? आणि ही नेमकी कसली बिझनेस क्लास फ्लाइट आहे ज्या एक मॉनिटर तुझ्या डोक्यापासून अवघ्या काही इंचवर आहे. खरोखर हा फोटो एडिट केला आहे.


सोशल मीडिया लाखो फॉलोअर्स
हरिमाओ आपल्या सोशल मीडियावर रोज एकापेक्षा एक फोटो अपलोड करून लाइक्स मिळवते. इंस्टाग्रामवर तिचे 1 लाख 27 हजार फॉलोअर्स आहेत. परंतु, यावेळी तिच्यावर टीका करताना चाहत्यांनी काहीच विचार केला नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...