आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक पालकत्व भौतिकशास्त्राप्रमाणे आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जर तुम्ही प्रत्येक कामात पहिल्या नंबरला महत्त्व देत असाल तर शालेय शिक्षण होईपर्यंत केवळ मार्कच महत्त्वाचे ठरतील.

न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार प्रत्येक क्रियेसाठी एक समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते आणि हे कमीत कमी आधुनिक पालकत्वाच्या बाबतीत तरी खरे आहे. ‘तुम्ही प्रश्नपत्रिका फोडू शकता काय?’ हा प्रश्न त्या अनेक अनपेक्षित प्रश्नांपैकी एक होता, जो इंटरमिजिएट सार्वजनिक परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी आंध्र प्रदेश राज्य शिक्षण मंडळासमवेत काम करणाऱ्या समुपदेशकांना विचारण्यात आला होता. आणखी एक प्रश्न असाही होता, ज्या प्रश्नाने मनोवैज्ञानिकही चकित झाले. तो प्रश्न असा होता की, ‘मी पूर्ण वर्ष पबजी खेळण्यात वाया घालवले, आता चांगले मार्क्स मिळवण्यासाठी काय करावे लागेल?’ एखाद्या राज्यापुरतीच ही समस्या मर्यादित नाही, तर अनेक राज्यांतील विद्यार्थी, तणावग्रस्त मुलांना मदत करण्यासाठी राज्य सरकारांनी नेमलेल्या मनोवैज्ञानिकांना कॉल करतात. त्याचा उद्देश एकच आहे की, चांगले मार्क्स मिळवण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती आहे? काही मुले तर कोणत्याही किमतीत केवळ पास होऊ इच्छितात. हे मनोवैज्ञानिक ही गोष्ट कबूल करतात की, केवळ ढ विद्यार्थीच अशी मदत मागत नाहीत तर तणावात असलेले हुशार विद्यार्थीही मदत मागतात. अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी असेही आहेत की, आम्ही आमच्या पालक आणि शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकू काय? असा प्रश्न मनोवैज्ञानिकांना विचारत आहेत. एका मुलाने तर रडत फोनवर सांगितले की, मी गणितात नेहमीच टॉपवर असतो म्हणून बोर्डाच्या परीक्षेत मी चांगले मार्क मिळवीन अशी माझ्या शिक्षकांना आशा आहे. हे शक्य आहे काय? आश्चर्याची गोष्ट ही आहे की, दहावीच्या परीक्षेत टॉपर्स असलेल्या मुलांना आपण बारावी परीक्षेत टॉपर होऊ की नाही याची भीती आहे. फोन करण्याची वेळ दुपारी ३ ते रात्री ८ अशी आहे, पण अनेक मुले मध्यरात्रीनंतर फोन करतात. कारण आपला मुलगा तथाकथित ‘बाहेरच्या लोकांची’ मदत घेतो हे त्यांच्या पालकांना कळू नये अशी त्यांची इच्छा असते. पण पास होण्याची खात्री असलेल्या काही मुलांनी तरी केवळ जोरात रडण्यासाठी आणि परीक्षेची भीती घालवण्यासाठी फोन केल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांत मुलांमध्ये हा नवा भ्रम कोठून निर्माण झाला याचा कधी तुम्ही विचार केला आहे काय? काही मुले चांगले गुण मिळवण्यासाठी शॉर्टकट शोधत आहेत, तर आपण आपल्या पालक आणि शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू की नाही, हा आत्मविश्वासही अनेक मुलांमध्ये नाही. दोन्ही परिस्थितींमध्ये चांगले गुण मिळवणे हे महत्त्वाचे आहे. ज्यांची मुले सध्या नर्सरी किंवा किंडर गार्टनमध्ये आहेत त्यांच्या पालकांशी माझी एक बैठक झाली. त्यांनी मला जे प्रश्न विचारले, ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल. पालकांकडून आलेले काही प्रश्न असे : ‘गेल्या एक महिन्यापासून माझा मुलगा नर्सरीत आहे, असे असूनही तो पालकांच्या मदतीशिवाय ए टू झेड का म्हणू शकत नाही?’ दुसऱ्या पालकांची तक्रार आहे, ‘माझा मुलगा इंग्रजीत पहिली चार अल्फाबेट्स का लिहू शकत नाही?’ पालकच असे भांडत असतील तर परीक्षा देताना या मुलांच्या डोक्यावर काय टेन्शन असेल?

फंडा असा : जर तुम्ही प्रत्येक कामात पहिल्या नंबरला महत्त्व देत असाल तर शालेय शिक्षण होईपर्यंत केवळ मार्कच महत्त्वाचे ठरतील. काय निर्णय घ्यायचा हे तुम्हीच ठरवा.

बातम्या आणखी आहेत...