आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीडनच्या राजाची विनम्रता; स्वत: बॅगा उचलून दर्शवला साधेपणा

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्वीडनचे सोळावे राजे कार्ल गुस्ताफ व राणी सिल्व्हिया सोमवारी एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीत दाखल झाले. दिल्ली विमानतळावर या दोघांची छायाचित्रे एअर इंडियाने टि्वटर हँडलवर शेअर केली. स्वीडिश शाही जोडप्यानी आपल्या बॅगा स्वत: उचलल्या होत्या. हे पाहून सोशल मीडियावर लोकांनी त्यांचे कौतुक केले. तत्पूर्वी या शाही जोडप्यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आले. पाच दिवसाच्या दौऱ्यात ते दिल्लीतील जामा मशीद, लाल किल्ला व गांधी स्मृती भवनास भेट देणार आहेत. स्वीडिनच्या राजाच्या या दौऱ्यात उभय देशात भविष्याच्या दृष्टीने अनेक करार होऊ शकतात. भारत व स्वीडनमध्ये गेल्या काही वर्षांत खूप दृढ झाले आहेत. दोन्ही देशांत २०१८ मध्ये द्विपक्षीय व्यापार ३.३७ अब्ज डॉलरचा होता. बातम्या आणखी आहेत...