आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi 2.0: NDA's Constituent Meeting Begins, Narendra Modi's Election As Leader Of Parliamentary Party

Modi 2.0: एनडीएच्या घटकपक्षांची बैठक सुरू, संसदीय दलाच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची झाली निवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या यशस्वी निकालानंतर एनडीएच्या घटकपक्षांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक घेतली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. या बैठकीत मोदींसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह जदयूचे नेते नितीश कुमार आणि अनेक मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली. मोदींना संसदीय दलाचे नेते निवडण्यासाठी अमित शहांनी प्रस्ताव दाखल केला. त्यास राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी समर्थन दिले. या बैठकीला नवनिर्वाचित एनडीएच्या खासदारांसह वरिष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनीही हजेरी लावली. बैठकीनंतर मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन आज रात्री सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.

 

या निवडणुकीने देशाला जोडण्याचे काम केले...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निवडणुकीत देशवासियांचे आभार मानले. "आचार्य विनोबा भावे म्हणायचे की निवडणुका विभाजनाचे काम करतात. दुरावे वाढतात, भिंती तयार होतात आणि लोकांमध्ये दरी निर्माण होतात. परंतु, 2019 च्या निवडणुकीने मने जोडण्याचे काम केले आहे. ही निवडणूक सामाजिक एकात्मतेचे आंदोलन बनली होती. समता आणि मता देखील. समभाव आणि मम भाव सुद्धा. भारताच्या लोकशाही जीवनात देशाच्या जनतेने एका नव्या युगाचा आरंभ केला आणि त्याचे आम्ही साक्षीदार बनलो.'' मोदी पुढे म्हणाले, ''भाजप आणि एनडीएच्या सर्वच खासदारांनी सर्वसंमतीने माझी संसदेच्या नेतेपदी निवड केली. यासाठी मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. ही सेंट्रल हॉलमधील एक विशेष घटना आहे. आज आम्ही या ठिकाणी भारताच्या संकल्पाला एक नवी ऊर्जा घेऊन पुढे जाण्याचा आरंभ करणार आहोत.''

 

मोदींना राष्ट्रपतींकडे सोपविला राजीनामा
केंद्रीय कॅबिनेटने शुक्रवारी 16 वी लोकसभा बरखास्त करण्याचा ठराव मंजूर केला. त्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली. मोदींनी शुक्रवारीच आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपविला. त्यानंतर कोविंद यांनी मोदींना पुढील सरकार स्थापित करण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर राष्ट्रपती भवनात प्रितीभोजचे आयोजन देखील करण्यात आले. सुत्रांच्या माहितीनुसार, संसदीय दलाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर आता नरेंद्र मोदी सत्ता स्थापनेचा दावा घेऊन शनिवारी रात्रीच राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. तसेच 26 मे रोजी त्यांचा शपथविधी होणार आहे.