आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • "Modi And Mahatma Gandhi's Murderer Godse's Ideology Is Same': Rahul; Congress Constitution March In Wayanad, Kerala

'मोदी आणि म. गांधींचा मारेकरी गोडसेची विचारसरणी एक' : राहुल; केरळच्या वायनाडमध्ये काँग्रेसचा संविधान मार्च

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वायनाड जिल्ह्यातील कलपेटा शहरात काँग्रेसने संविधान मार्च काढला. राहुल सहभागी झाले. - Divya Marathi
वायनाड जिल्ह्यातील कलपेटा शहरात काँग्रेसने संविधान मार्च काढला. राहुल सहभागी झाले.

वायनाड : काँग्रेसचे राहुल गांधी गुरुवारी त्यांचा मतदारसंघ केरळमधील वायनाडला आले. ते नागरिकत्व कायद्याविरोधातील संंविधान मार्चमध्ये सहभागी झाले. ते म्हणाले की, म. गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे व नरेंद्र मोदी यांची विचारसरणी एकच आहे. गोडसे कुणावरच प्रेम करत नव्हता. त्याला कुणाचीच पर्वा नव्हती. आपले पंतप्रधानही तसेच आहेत. ते केवळ स्वत:वरच प्रेम करतात व स्वत:वरच विश्वास ठेवतात. गोडसेवर विश्वास नाही असे बोलण्याची मोदींमध्ये हिंमत नाही. देशाच्या रहिवाशांना भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी बाध्य केले जात आहे. लोकांचे नागरिकत्व निश्चित करण्याचा परवाना मोदींना कोणी दिला. आपण भारतीय आहोत. आपल्याला कुणासमोरही नागरिकत्व सिद्ध करण्याची गरज नाही.

प्रक्षाेभक भाषण: डॉ. कफिलला यूपी एसटीएफकडून मुंबईत अटक

मुंबई : उत्तर प्रदेश एसटीएफने प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपात डॉ. कफिल खान यांना मुंबईतून अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार कफिल यांनी १२ डिसेंबर रोजी एएमयूमध्ये ६०० विद्यार्थ्यांसमोर सीएए आणि एनआरसीविरोधात भाषण दिले होते. त्यांनी सांगितले होते की, सीएए मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवत आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका करत म्हटले होते की, 'मोटाभाई' सर्वांना हिंदू किंवा मुस्लिम बनणे शिकवत आहेत.

दावा: शर्जीलला भारत इस्लामी देश बनवायचाय

नवी दिल्ली : आसामला भारतासून वेगळे करण्याच्या वक्तव्यावरून अटकेतील जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामची पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, शर्जील अत्यंत कट्टर आहे. त्याला वाटते की भारत इस्लामी देश असावा.

बातम्या आणखी आहेत...