Home | National | Other State | Modi and Rahul gandhi commenting on each other

सरकार स्थापना निश्चित, तुकड्यातील टोळीचे तुकडे होणार -मोदी; मोदी अजेय नाहीत - राहुल

दिव्य मराठी | Update - Apr 12, 2019, 08:32 AM IST

सरकार स्थापना निश्चित, तुकड्यातील टोळीचे तुकडे होणार -मोदी; मोदी अजेय नाहीत - राहुल

  • Modi and Rahul gandhi commenting on each other

    भागलपुर/रायबरेली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बिहारमध्ये एक व आसाममध्ये दोन सभा घेतल्या. ते म्हणाले, २३ मे रोजी मोदी सरकार पुन्हा येणार हे निश्चित आहे. सरकार स्थापनेनंतर तुकड्या-तुकड्यातील टोळीचे तुकडे होतील. बिहारमधील महाआघाडीवर निशाणा साधत म्हणाले, हे महाभेसळीचे नेते भीती निर्माण करत आहेत की, या वेळी मोदी आल्यास देशातील निवडणूक संपुष्टात येईल. मोदी आल्यास त्यांचा भ्रष्टाचार व घराणेशाही राजकारणाचे दुकान बंद होईल,अशी त्यांना भीती आहे. राहुल गांधी यांनी मोदींना रायबरेली उत्तर दिले. ते म्हणाले, मोदी अजेय नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर ही बाब स्पष्ट होईल. स्वत: अजेय असल्याचा गर्व असणारे चुकीचे ठरले, हा इतिहास आहे.

    सोनियांच्या संपत्तीत २.५ कोटी वाढ, उत्पन्न ४५% घटले

    रायबरेली - संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी रायबरेलीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जातील विवरणानुसार, त्यांनी ४.२९ कोटी रुपयांच्या मालमत्तेची माहिती दिली. इटलीतील २३ लाख रुपयांच्या वडिलोपार्जित संपत्तीचाही उल्लेख आहे. गेल्या निवडणुकीत जाहीर केलेल्या संपत्तीच्या तुलनेत या वेळी ४५% घट झाली आहे. २०१४ मध्ये त्यांचे विविध स्रोतांतून वार्षिक उत्पन्न १७ लाख रुपये होते हे जाहीर करण्यात आले हाेते.

Trending