आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक : मिशन शक्ती लाँच झाल्यावर मोदी, ‘चौकीदार चोर है’वर माफी मागितल्यावर राहुल गुगलवर जास्त सर्च झाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दोन महिने चाललेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे राहिले. गुगल ट्रेंड्सनुसार, १० मार्च ते १५ मेपर्यंत ६६ दिवसांत गुगल सर्चिंगमध्ये मोदींचे सरासरी गुण ७४ तर राहुल यांचे सरासरी गुण १२ राहिले. मोदी सर्वात जास्त २७ मार्चला सर्च झाले. त्या दिवशी उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र लाँच झाले होते. मोदींनी देशाला त्याची माहिती दिली होती. राहुल सर्वात जास्त २२ एप्रिलला सर्च झाले. त्या दिवशी राहुल यांनी ‘चौकीदार चोर है’ या वक्तव्यावर सुप्रीम कोर्टाची माफी मागितली होती. यंदाच्या निवडणुकीत प्रियंका, ममता बॅनर्जी आणि मायावती या तीन महिलांचा प्रभाव होता. तिघींनीही भाजप आणि पंतप्रधान मोदींना जोरदार विरोध केला. त्यात गुगलवर मायावती आघाडीवर राहिल्या.


या महिलांत मायावतींचे सरासरी गुण सर्वात जास्त ४१ राहिले. त्यानंतर प्रियंका गांधींचे सरासरी २९ आणि ममता बॅनर्जींचे सरासरी २१ गुण राहिले. मायावतींना उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात सर्वाधिक सर्च करण्यात आले. ममता बॅनर्जींना सर्वात जास्त पश्चिम बंगालमध्ये सर्च करण्यात आले. प्रियंका गांधींना जवळपास सर्व राज्यांत सर्च करण्यात आले. प्रियंका सर्वात जास्त नागालँड, दादरा नगर हवेली आणि केरळमध्ये सर्च झाल्या. लोकांनी भाजपला काँग्रेसच्या तुलनेत जास्त सर्च केले. भाजपचे सरासरी गुण ३८ तर काँग्रेसचे २० गुण राहिले. १० मार्चला भाजपचे सरासरी गुण १५ होते, ते १५ मेपर्यंत वाढून २५ झाले. १० मार्चला काँग्रेसचे सरासरी गुण १० आणि १५ मे रोजी १४ गुण झाले.

 

राज्य    मोदी (सर्चिंग %) 
यूपी    92%
नागालँड     49%
बिहार    92%
केरळ    47%
राजस्थान    89%

 

राज्य    राहुल(सर्चिंग%)
पुद्दुचेरी    40%
बंगाल    88%
मिझोराम    35%
जम्मू-काश्मीर    88%
तामिळनाडू    27%