आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेचां घणाघात; मोदी-शाहांनी आतापर्यंत दादागिरीच केली, मग आता ममतांनी केली तर काय बिघडलं?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भजपविरूद्ध रणशिंग फुंकल्यानंतर ते विवध सभांमध्ये भाजपवर टीका करताना दिसतात. आता परत एकदा त्यांनी भाजपवर टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते दादरमधील आंबा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. शिवाजी पार्क येथील वनिता समाज इथे हा आंबा महोत्सव भरवण्यात आला आहे. अभिनेते संजय मोने आणि सुकन्या मोने यांनी आयोजित केलेल्या आम्र महोत्सवाचे राज ठाकरेंच्या हस्ते उद्धाटन झाले. यावेळी राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरही भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, "मोदींच्या कालच्या पत्रकार परिषदेबद्दल न बोललेले बरे, कारण मोदी स्वतः काहीच बोलले नाहीत, तर मग आपण काय बोलायचे."


"5 वर्षात तुम्ही पत्रकांसमोर कधीच आल नाहीत. पंतप्रधान पत्रकारांना इतके का घाबरतात, याची उत्तरे त्यांनी स्वत:च द्यावी. असे त्यांनी काय केलंय ज्यामुळे ते पत्रकारांपासून एवढे पळत आहेत," असा सवाल राज ठाकरे यांनी केला.


यासोबतच ते म्हणाले, "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. आजवर मोदी आणि अमित शाह यांनी दादागिरीच केली आहे. मग आता ममता बनर्जींनी केली तर कुठे बिघडलं? अमित शाहांना कळू दे दादागिरी काय असते ते. कोलकात्यातील रॅली अर्धी सोडून पळून आले. यांच्या बाबतीत असं व्हायलाच हवं होतं."


अमित शाहांच्या रॅलीत हिंसाचार
दरम्यान, चार दिवसांपूर्वी कोलकात्यात अमित शाहांच्या रॅलीत तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्तांमध्ये प्रचंड गोंधळ होऊन हिंसाचार भडकला होता. यावेळी दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली होती. तृणमूलने हा हल्ला केल्याचा आरोप अमित शाह यांचा आहे. तर भाजप कार्यकर्त्यांनीच हा राडा घातल्याचा दावा ममता बॅनर्जींनी केला.


मोदी-शाहांची पत्रकार परिषद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षातील पहिली पत्रकार परिषद शुक्रवारी 17 मे रोजी घेतली होती. या पत्रकार परिषदेला अमित शाहही उपस्थित होते. यात मोदींनी पत्रकारांच्या कोणत्याच प्रश्नांची उत्ते दिली नाहीत. सर्व प्रश्नांना अमित शाहांनीच उत्तरे दिली. मोदींनी आपले म्हणणे मांडून पत्रकार परिषदेला हजेरी लावली.