आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोटे मंत्रिमंडळ की प्रा. लि.?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोटे मंत्रिमंडळ म्हणजे सत्ता मोजक्याच लोकांच्या हातात राहावी, असा डाव दिसतो. आहेत इतके मंत्रीही जास्त झाले. 5 मंत्री सर्व कारभार सांभाळू शकले असते. नाही तरी ही निवडणूक अमेरिकेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीसारखी झाली. तेथे मंत्री हे अध्यक्षाने नेमलेले असतात. येथेही तसेच होताना दिसत आहे. मंत्र्यांना आपला पीए नेमण्यासाठी पीएमओची परवानगी घ्यावी लागत आहे. गृहमंत्री राजनाथसिंह अजून आपला खासगी सचिव नेमू शकले नाहीत. कारण पीएमओची परवानगी नाही. मंत्र्यांनी आपला जवळचा नातेवाइक खासगी सचिव म्हणून नेमू नये इथपर्यंत ठीक होते; परंतु खासगी सचिव नेमण्यासाठी पीएमओची परवानगी हे जर अतिच होते. त्यातही राजनाथसिंह यांचे क्रमांक 2 चे स्थान आहे. त्यांनी नंबर एकवर जाण्याची खटपट करू नये म्हणून तर त्यांना तावून सुलाखून खासगी सचिव नेमण्याची परवानगी दिली जाईल काय?