आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi Cabinet Reshuffle? A Review Of The Work Of Ministers, Taken Twice In 15 Days, Will Be Conducted Accordingly

मोदी मंत्रिमंडळात फेरबदल? 15 दिवसांत दोनदा घेतला गेला मंत्र्यांच्या कामाचा आढावा, त्यानुसारच केले जाईल मूल्यांकन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या मोठ्या विस्ताराच्या तयारीत आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयाने सर्व मंत्रालयांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट आणि स्वतंत्र जबाबदारी असलेले राज्यमंत्री ६ ते ८ जानेवारीपर्यंत सलग तीन दिवस आपल्या मंत्रालयाची कामगिरी सादर करतील. या मंत्रालयांच्या सचिवांना आकडेवारीसह प्रेझेंटेशन बनवण्यास सांगण्यात आले आहे. मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची ही गेल्या १५ दिवसांतील दुसरी वेळ आहे. पंतप्रधानांनी २१ डिसेंबरला सहा-सहा मंत्र्यांचा गटनिहाय आढावा घेतला होता. सुमारे ९ तास चाललेल्या आढावा बैठकीतच येत्या १५ दिवसांत पुन्हा मूल्यांकन होईल व त्याची तयारी करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आली होती.

बिहार निवडणुकीवर डोळा

वर्षअखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. तेथे जदयूसह सत्तेत सहभागी असलेल्या भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषणा केली आहे, तर जदयूने केंद्रात फक्त एकच मंत्रिपद घेण्यास नकार दिला होता. या बदल्यात जदयूला एकपेक्षा जास्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...