आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत चहा पीत असताना प्रवाशाची कपावर गेली नजर, त्यावर जे लिहीले होते ते पाहून भडकला; कपाचा फोटो केला ट्वीट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक 2019 मध्ये रेल्वे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे प्रकरण समोर आले आहे. शुक्रवारी एका रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की, त्यांना 'मैं भी चौकीदार' लिहिलेल्या कपात चहा देण्यात आला. काठगोदाम शताब्दी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने पेपर कपचा फोटो ट्विटरवर ट्वीट केला. यानंतर रेल्वेने पाऊल उचलत सर्व कप काढून टाकले आणि विक्रेत्यावर एक लाख रूपयांचा दंड ठोठावला. 


> मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा करण्यात आला की, दोन वेळेस अशा कपातून चहा देण्यात आला आहे. या कपांवर 'संकल्प फाउंडेशन'ने जाहीरात दिली होती. काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो असलेले तिकीट दिल्याचे आरोप लावण्यात आले होते. पण नंतर रेल्वेने यावर स्पष्टीकरण देत ही नकळत झालेली चूक असल्याचे सांगितले. 


> आयआरसीटीसीच्या एका प्रवक्यांनी सांगितले की, 'मैं भा चौकीदार लेबल असलेल्या कपात चहा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत तपासणी करण्यात आली आहे. आयआरसीटीसीची मंजूरी न घेताच चहा देण्यात आला आहे. तसेच कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सुपरवाइजर/पैंट्री अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.' पुढे ते म्हणाले की, 'विक्रेत्याला एक लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या गैरवर्तनसाठी सेवा प्रदात्यास कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली गेली आहे.'
 

बातम्या आणखी आहेत...