आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींनी साधला २५ लाख चौकीदारांशी साधला संवाद, म्हणाले-आज संपूर्ण देश चौकीदार होण्यास आतुर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील २५ लाख चौकीदारांशी ऑडिओद्वारे संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मोदी म्हणाले, काही लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी चौकीदारांविरोधात चुकीची माहिती देणारी मोहीम सुरू केली आहे. या लोकांच्या वक्तव्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, हे दुर्दैवी आहे. काही लोकांनी चौकीदार चाेर है, अशी घोषणाबाजी करून देशातील वॉचमन लोकांचा अपमान केला आहे. मी आपणा सर्व चौकीदारांची माफी मागतो. कारण काही लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी शिवीगाळ सुरू केली आहे. चौकीदारास चोर म्हटले आणि चौकीदाराच्या तपश्यर्चेत प्रश्नचिन्ह उभे केले. आजकाल प्रत्येक ठिकाणी चौकीदाराचीच चर्चा होते आहे. मग टीव्ही असो की टि्वटर, देश असो की परदेश प्रत्येक ठिकाणी चौकीदार शब्द घुमतो आहे. आज संपूर्ण देश चौकीदार होण्याची शपथ घेतो आहे. आणि म्हणतो आहे मै भी चौकीदार  

 

 

चौकीदारांना दाखवली माेठी स्वप्ने  
मोदी यांनी २५ लाख चौकीदारांशी बोलताना म्हटले, आपल्याला खूप पुढे जायचे आहे. तुमच्या मुलांना मोठा माणूस बनवायचे आहे. त्याला डॉक्टर, इंजिनिअर करायचे आहे. लष्करातील जवान करायचे आहे. देशाचा पंतप्रधान बनवायचे आहे. आपल्या मुलांमध्ये चौकीदारांचे संस्कार करायचे आहेत. मोदींनी कोणाचेही नाव न घेता विरोधी पक्षांवर टीका केली. काही नेते शहीद जवान व लष्कराच्या शौर्यावर राजकारण करत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser