आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi Criticizes Mamata Banerjee For Failing To Implement Ayushman Bharat And Kisan Samman Scheme

'राज्यकर्त्यांना देव सदबुद्धी देवो', आयुष्मान भारत आणि किसान सन्मान योजना लागू न केल्यामुळे मोदींची ममता बॅनर्जींवर टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधानांनी कोलकाता पोर्टचे नाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर करण्याची घोषणा केली, ममता कार्यक्रमात आल्या नाहीत

कोलकाता- नागरिकत्व कायदा कोणाचे नागरिकत्व घेण्यासाठी नाही तर नागरिकत्व देण्यासाठी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकातामध्ये म्हणाले. मोदी रविवारी बेलूर मठमध्ये बोलत होते. पुढे ते म्हणाले की, गांधीजी म्हणायचे की, पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्यकांनी भारतीय नागरकित्व द्यायला पाहीजे. पुढे मोदी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150 व्या वर्षात पदार्पनाच्या कार्यक्रमातही गेले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बनर्जी आल्या नाहीत. मोदींनी कोलकाता पोर्टला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचे नाव देण्याची घोषणा केली.

मोदींनी राज्यात आयुष्मान भारत आणि पीएम किसान सन्मान योजना लागू न केल्यामुळे ममता सरकारवर निशाना साधला. मोदी म्हणाले की, "मला माहित नाही राज्य सरकार आयुष्मान भारत योजनेसाठी परवानगी देईल का नाही. जर राज्य सरकारने योजना लागू केली तर नागरिकांचे आरोग्या संबंधित समस्यांचे निराकरण होईल. राज्य कर्त्यांना इश्वर सदबुद्धी देवो."

तरुण वर्गाचा सीएएला पाठींबा

बेलूर मठमध्ये बोलताना मोदी म्हणाले की, "काही लोक सीएएबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. पण मला आनंद आहे की, तरुण वर्ग सीएएला पाठिंबा दर्शवत अशा अफवा दूर करत आहेत. पाकिस्तानात ज्याप्रमाणे दुसऱ्या धर्मातील लोकांवर आत्याचार होत आहे, त्याबद्दल आपल्या देशातील तरुणवर्ग आवाज उठवत आहे. नागरिकत्व कायद्यात आम्ही बदल केला नसता तर इतर देशात मानवाधिकाराचे कसे हनन केले जाते, ते येथील नागरिकांना कळालेच नसते." 
 

बातम्या आणखी आहेत...