आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी प्रत्यार्पणावर बोललेच नाहीत, मलेशियाच्या पंतप्रधानांचे स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉलालाम्पूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला हवा असलेला झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणाविषयी काही सांगितले नसल्याचे स्पष्टीकरण मलेशियाचे पंतप्रधान महाथिर बिन मोहंमद यांनी दिले आहे. नरेंद्र मोदी आणि महाथिर यांच्यादरम्यान याच महिन्यात रशियातील आर्थिक फोरमदरम्यान मुलाखत झाली होती.

मलेशियाचे पंतप्रधान महाथिर बिन मोहमंद यांनी मंगळवारी सकाळी बीएफएम मलेशिया रेडिओला सांगितले की, अनेक देशांना झाकीर नाईक नको आहे. माझी आणि मोदींची भेट झाली पण त्यांनी त्या व्यक्तीबाबत काहीच सांगितले नाही. त्यांनी सांगितले की, पुत्राजय शहरात अजूनही अशा जागेचा शोध घेण्यात येत आहे जेथे झाकीर नाईकला पाठवता येईल. वंशवादी वक्तव्य करणाऱ्या झाकीर नाईक यांच्यावर असलेली सार्वजनिक ठिकाणी भाषण करणाऱ्यावरील बंदी लवकरच उठवली जाईल. नाईक यांच्या वांशिक वक्तव्यात चीनच्या लोकांना चीनमध्ये परत पाठवण्याबाबतच्या वक्तव्याचा समावेश आहे.

महाथिर म्हणाले की, तो या देशाचा नागरीक नाही. मला वाटते की आधीच्या सरकारने तात्पुरता रहिवाशाचा दर्जा दिला आहे. एक तात्पुरता रहिवाशी देशातील व्यवस्था आणि राजकारणावर काही मत व्यक्त करू शकत नाही. त्याने या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्याला आता बोलण्याची परवानगी नाही. ते म्हणाले की आम्ही अशा जागेचा शोध घेतोय जेथे त्याला पाठवता येईल. मात्र, त्याला कोणी सध्या स्वीकारत नाही.
 

दहशतवादासारखे गंभीर आरोप
२०१६मध्ये बांगलादेशातील ढाका येथे होली आर्टिझन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोट प्रकरणात नाव आल्यानंतर झाकीर नाईकवर भारतात दहशतवादासारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. मुंबईत जन्मलेला आणि वादग्रस्त पीस टीव्हीचा संस्थापक असलेला झाकीर नाईक २०१७ मध्ये भारतातून पळून गेल्यानंतर मलेशियात वास्तव्याला आहे. भारताला तो हवा आहे.