आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकार 2.0: नितीन गडकरींना मिळणार मोठी जबाबदारी! मंत्री होणाऱ्या खासदारांना शहांनी केला फोन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा सत्ता स्थापित करणाऱ्या एनडीए सरकारचे मंत्री गुरुवारी शपथ घेत आहेत. यामध्ये 64 मंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवन परिसरात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मोदींनी शपथविधी होण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी नवीन मंत्री होणाऱ्या खासदारांना लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेटीसाठी बोलावले. या सर्वच मंत्र्यांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः फोन करून आपण मंत्री होणार अशी बातमी दिली. या मंत्रालयात अनेक नवीन चेहरे त्यातही प्रामुख्याने महिला आणि युवकांचा समावेश राहणार असे सांगितले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. कालांतराने या मंत्र्यांची संख्या 76 पर्यंत पोहोचली होती.


या नेत्यांना अमित शहांचा फोन कॉल...
डीव्ही सदानंद गौडा, गिरीराज सिंह, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी, प्रकाश जावडेकर, हरसिमरत कौर बादल, मनसुख मांडविया, नितीन गडकरी, रामविलास पासवान, जितेंद्र सिंह, नित्यानंद राय, निरंजन ज्योती, बाबुल सुप्रियो, देवश्री चौधरी, रामेश्वर तेली, व्हीके सिंह, श्रीपद येसो नाइक आणि रमेश पोखरियाल निशंक...


अर्थमंत्रालयासाठी गडकरी, इराणी, सुषमांची नावे चर्चेत
एनडीए-1 सरकारमध्ये परिवहन मंत्री राहिलेले नितीन गडकरी यांचे नाव अर्थमंत्री पदासाठी चर्चेत आहे. याच पदासाठी सुषमा स्वराज यांचेही नाव घेतले जात आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही. सोबतच, आपण मंत्रिपद सांभाळण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले आहे. चर्चेत असलेल्या इतर नावांमध्ये निर्मला सितारमण आणि स्मृती इराणी यांचाही समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, परदेशात उपचारासाठी गेलेले माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिपद नको असे पत्र मोदींना पाठवले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...