आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर : प्रायव्हेट जॉब करणाऱ्या मोदी सरकावर लवकरच देणार भेट, होऊ शकतो लाखोंचा फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मोदी सरकार प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करणाऱ्या लवकरच मोठी बेट देऊ शकते. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो. मोदी सरकार प्रायव्हेट सेक्टरमध्ये ग्रॅच्युटीसाठी आवश्यक असलेला किमान कालावधी 3 वर्षांवर आणण्याची तयारी करत आहे. जर एकाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या कंपनीमध्ये 3 वर्षे नोकरी केली तर त्याला ग्रॅच्युटी मिळेल. सध्या ग्रॅच्युटीसाठी किमान 5 वर्षे नोकरी केलेली असणे गरजेचे आहे. 


कामगार मंत्रालयाने इंडस्ट्रीकडून मागवला सल्ला 
कामगार संघटना दीर्घकाळापासून प्रायव्हेट सेक्टरमध्ये ग्रॅच्युटीसाठी नोकरीचा कालावधी घटवण्याची मागणी करत आहेत. ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरीबाबतच्या अनिश्चितता दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याशिवाय कर्मचारीदेखिल एकापाठोपाठ जॉब बदलत असतात. पण ग्रॅच्युटीसाठी 5 वर्षे नोकरी झालेली असणे गरजेचे आहे. असा स्थितीत 5 वर्षांच्या आत नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीचे नुकसान होत असते. कामगार मंत्रालयाने आता ग्रॅच्युटीचा कालावधी कमी केल्यास काय परिणाम होईल याबाबत उद्योग क्षेत्राकडून सल्ला मागवला आहे. 

 
30 दिवसांच्या पगारानुसार ठरणार ग्रॅच्युटी 
त्याशिवाय कामगार मंत्रालया ग्रॅच्युटी मोजण्याच्या पद्धतीतही बदल करण्याच्या विचारात आहे. त्यानुसार ग्रॅच्युटी 30 दिवसांच्या पगारानुसार देण्याचा विचार आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या 15 दिवसांच्या पगारानुसार ग्रॅच्युटी दिली जाते. 
 

काय आहे ग्रॅच्युटी.. 
ग्रॅच्युटी कर्मचार्याच्या पगाराचा एक भाग आहे. तो कंपनी किंवा एम्पलॉयर तुमच्या अनेक वर्षांच्या नोकरीच्या मोबदल्यात देत असतो. ग्रॅच्युटी ही अशी लाभदायी योजना आहे जी रिटायरमेंट लाभांचा भाग असून नोकरी सोडल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना कंपनीकडून मिळत असते. 

बातम्या आणखी आहेत...