Article 370 / मोदी सरकारने ३७० कलम अमानुषपणे हटवले : उर्मिला मातोंडकरची टीका

आता काश्मीरच्या विकासाला केंद्र सरकारने गती द्यावी. तेथील बेेरोजगारी हटवण्यासाठी उद्योग, व्यवसायाला चालना द्यावी

Aug 30,2019 07:47:00 AM IST

नांदेड - काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यामुळे त्या भागाचा विकास होणार असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, परंतु मोदी सरकारने ३७० कलम अतिशय अमानुषपणे हटवल्याची टीका काँग्रेसच्या नेत्या व चित्रपट अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी गुरुवारी केली. काँग्रेसातर्फे दहीहंडी कार्यक्रमासाठी आल्या असताना त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. काश्मीरचा विकास व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे. त्याला अडथळा जर ३७० कलमाचा असेल तर आता तेही हटवण्यात आले आहे. त्यामुळे काश्मीरच्या विकासाला केंद्र सरकारने गती द्यावी. तेथील बेेरोजगारी हटवण्यासाठी उद्योग, व्यवसायाला चालना द्यावी. काश्मीरच्या विकासाबाबत दुमत नाहीच, परंतु सरकारने ज्या पद्धतीने ते हटवले ती पद्धत अमानुषपणाची आहे. अजूनही तेथील स्थिती सर्वसामान्य झाली नाही. तेथील इंटरनेट सेवा, टेलिफोन सेवा आदी अजूनही सुरू झाल्या नाहीत. माझे सासू - सासरे काश्मिरात आहेत.

X