आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच तुमचा पासपोर्ट रद्द होणार...! मिळेल नवीन e-Passport, चिपमध्ये स्टोर होईल तुमचे डिटेल्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- परदेश प्रवास करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो पासपोर्ट, पण लवकरच जुना पासपोर्ट बंद होऊ शकतो. केंद्रातील  मोदी सरकार आता इलेक्ट्रनिक चिप असलेले पासपोर्ट आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन पासपोर्टचे काम पूर्ण झाले आहे. नवीन पासपोर्टमध्ये अॅडव्हान्स सिक्योरिटी सिस्टीम असलेली चिप असेल. या चिपमध्ये त्या व्यक्तीची पूर्ण माहिती असेल, तसेच या पासपोर्टा कागदही हायटेक असेल.


नवीन पासपोर्टचे सॉफ्टवेअर आयआयटी कानपूर आणि नॅशनल इंफॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी)ने मिळून तयार केले आहे. पासपोर्ट धारकाची संपूर्ण माहिती या चिपमध्ये स्टोअर केलेली असेल. पासपोर्टला कोणत्याही प्रकारे छेडल्यास लगेच कळून जाईल. 


कुठे तयार होई ई-पासपोर्ट
नवीन चिप असलेला पासपोर्ट म्हणजेच ई-पासपोर्टची मॅन्युफॅक्चरिंग नाशिकच्या इंडियन सिक्योरिटी प्रेस (ISP) मध्ये केली जात आहे. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनाइजेशनने ISP ला चिप असलेल्या पासपोर्टच्या ऑपरेटिंग सिस्टिमसाठी टेंडर टाकण्याची परवानगी दिली आहे. टेंडर प्रक्रिया पुर्ण झाल्यावर हे ई- पासपोर्ट तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल.


कसा असेल चिप असलेला पासपोर्ट
ई-पासपोर्टच्या प्रोटोटाइपचा प्रयोग अमेरिकेतील सरकार मान्य लॅबोरेटरीमध्ये केला आहे. नवीन पासपोर्टचे समोरचे आणि मागचे कव्हर मोठे असू शकते. याच्या बॅक साईडला छोटा सिलीकॉन कव्हर असू शकतो. ही चिप पोस्टल कार्डपेक्षाही लहान असेल आणि यात एक अँटिनाही असेल. चिपमध्ये 64 किलोबाईट्सची मेमोरी असेल. चिपमध्ये त्या व्यक्तीचा फोटो आणि फिंगरप्रिंट सेव असतील. चिपमध्ये 30 प्रवासाची माहिती स्टोअर करण्याची क्षमता आहे.


फक्त 7 दिवसात बनेल हा पासपोर्ट
आतापर्यंत पासपोर्ट तयार करण्यासाठी 15 ते 20 दिवस लाग होते. पण हे चिप असलेले पासपोर्ट तयार करण्यासाठी फक्त 7 दिवस लागतील. नवीन पासपोर्ट आल्यानंतर तुमचे जुने पासपोर्ट बंद केले जाईल.


सध्या या देशात आहेत ई-पासपोर्ट
भारतच्या आधी ई-पासपोर्ट सिस्टीमला अमेरिका, इटली, जर्मनी, जापान, यूरोपीय देश, हॉन्ग-कॉन्ग, इंडोनेशियासोबतच 86 लागून करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्येही या ई-पासपोर्टचा उपयोग सुरू करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...