आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वेळी उत्तर प्रदेशने नव्हे, तर पूर्वेने बनवले मोदी सरकार; राज्यांनी असे केले मतदान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपला त्यांच्या रणनीतीत यश मिळाले. उत्तर प्रदेशात नुकसान हाेण्याची शक्यता पाहून पूर्व भारतात जागा वाढवण्याचे नियाेजन भाजपने केले हाेते. या वेळी केंद्रात रालाेआच्या सत्तेचा मार्ग प.बंगाल, आेडिशा, आसाम व पूर्वोत्तर राज्यांतून गेला आहे. पहिल्यांदाच त्रिपुरातील दोन्ही जागा जिंकण्यात भाजपला यश आले. यामुळे त्यांना प्रथमच स्वबळावर ३०० चा आकडा पार करता आला. यासाेबतच


भाजप बिहार, झारखंड, महाराष्ट्र व कर्नाटकात विराेधी पक्षांच्या मजबूत मानल्या जाणाऱ्या आघाडीलाही पराभूत करण्यात यशस्वी ठरला. कर्नाटकात तर २८ पैकी २५ जागा पटकावल्या. तेथे माजी पंतप्रधान एच.डी.देवगौडांनाही पराभवाचा सामना करावा लागला.  

 

पूर्वोत्तरमध्ये भाजपने आसामचे मंत्री हेमंता बिस्वा सरमा व बंगालमध्ये  कैलाश विजयवर्गीय यांना २०१४ पासूनच कामाला लावले. एनआरसी, हिंदुत्व, अवैध बांगलादेशी घुसखाेर हे मुद्दे उचलले व या मुद्द्यांमुळेच हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण वेगाने झाले. तसेच तृणमूल, कम्युनिस्ट पक्षासह काॅंग्रेसचे बडे नेतेही आपल्याकडे वळवले. बंगालच्या २६ % हिंदीभाषिक मतांपैकी बहुतांश मते भाजपला मिळाली.  

 

बिहार व महाराष्ट्रात रालाेआस ९५ % जागा जिंकण्यात मिळाले यश 


> महाराष्ट्र : भाजप-शिवसेनेने आपल्या ४१ जागा राखल्या  
भाजप + 41 (+00), काँग्रेस + 5 (-01), इतर 02 (+1)

महाराष्ट्रात प्रचंड ताणाताणीनंतर भाजप-शिवसेना साेबत लढले. राष्ट्रवाद व विकास मुद्द्यांवर युतीला  स्वत:च्या ४१ जागा राखण्यात यश आले, तर काॅंग्रेस पक्ष शेतकऱ्यांचा संताप, ‘न्याय’ योजनेचे आश्वासन देऊनही गटबाजीमुळे अयशस्वी ठरला. आघाडीस पाचच जागा मिळाल्या. त्यात काॅंग्रेसची १ जागा आहे.  

 

> बिहार : एनडीएला सोशल इंजिनिअरिंगचा फायदा 
भाजप + 39 (+8), काँग्रेस + 01 (-8), इतर 00 (00)


भाजप-जदयु आघाडीस सोशल इंजिनिअरिंगचा फायदा झाला. भाजपने १७ सवर्णांना, तर जदयुने १७ पैकी १२ तिकिटे मागास व अतिमागास वर्गातील उमेदवारांना दिली. दुसरीकडे राजद व काॅंग्रेस पारंपरिक मुस्लिम-यादव समीकरणावर अडून राहिले. त्यामुळे त्यांचे माेठे नुकसान झाले.

 

> ओडिशा : ‘राधेकृष्ण...’च्या  घाेषणेमुळे भाजपला ८ जागा 
भाजप 08 (+07), बिजद 13 (-7), इतर 00 (00)

येथे भाजप कार्यकर्त्यांनी ‘राधेकृष्ण..’च्या घाेषणा देत मतदारांपर्यंत गेले. ‘राधे’चा अर्थ ‘लक्ष्मी’ म्हणजे लोकसभेसाठी कमळास मत द्या व विधानसभेसाठी  ‘कृष्ण’ म्हणजे त्यांच्या हातात असलेला ‘शंख’चा उल्लेख केला, जे बिजू जनता दलाचे निवडणूक चिन्ह आहे. या घाेषणेमुळे भाजपला ८ जागा मिळवून दिल्या. 

 

त्रिपुरामध्ये प्रथमच उघडले भाजपचे खाते
> भाजपने प्रथमच त्रिपुरात विजय मिळवला. विधानसभेतील विजयास पुढे नेत भाजपने कम्युनिस्ट पक्षाकडून ४० वर्षांनंतर दोन्ही जागा हिसकावल्या.  

> काँग्रेस बंगालमध्ये प्रथमच फक्त एका जागेवरच गुंडाळली गेली. अधिरंजन चौधरींनी ही जागा वाचवली. भाजपने पहिल्यांदाच ते दहाचा आकडा गाठला.   

> ओडिशात भाजप पहिल्यांदाच दुसरा माेठा पक्ष बनण्यात यशस्वी ठरला आहे. राज्यातील २१ मधून ८ जागा जिंकल्या.