MEA / अल-कायद्याच्या धमक्यांना गांभीर्याने घेऊ नये, कुठल्याही परिस्थितीसाठी भारतीय लष्कर सज्ज -परराष्ट्र मंत्रालय

ऐमन अल जवाहिरीने व्हिडिओ जारी करून दिल्या होत्या धमक्या

दिव्य मराठी वेब

Jul 11,2019 05:48:00 PM IST

नवी दिल्ली - अलकायदाचा म्होरक्या ऐमन अल-जवाहिरीच्या काश्मीर आणि भारतात हल्ल्याच्या धमक्यांवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी आपली प्रतिक्रिया जारी केली. त्यानुसार, ऐमन अल-जवाहिरीच्या धमक्यांना गांभीर्याने घेऊ नेय, भारतीय सैनिक कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत असे सरकारने स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी प्रामुख्याने अलकायदाच्या नवीन व्हिडिओवर सरकारचे मत मांडले. भारतीय लष्कर आपल्या राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.


पत्रकारांशी संवाद साधताना रवीश कुमार म्हणाले, की अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसोबत भारतीय प्रतिनिधींची बैठक सुरू आहे. ओसाकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान ही बैठक निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार, दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर चर्चा केली आहे. अलकायदाच्या म्होरक्याने भारताला दिलेल्या धमकीचा व्हिडिओ कुख्यात दहशतवादी संघटना अल-शबाबने जारी केला होता. या व्हिडिओमध्ये जवाहिरीने आपल्या समर्थकांना काश्मीरात भारत सरकार आणि सैनिकांना लक्ष्य करून हल्ल्याचे आदेश दिले. सोबतच, पाकिस्तान दहशतवाद्यांचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापर करते असा आरोप केला. अमेरिकन लेखक थॉमस जोसलीन यांनी फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रेसीज नावाच्या जर्नलमध्ये जवाहिरीच्या व्हिडिओचा तपशील मांडला होता.

X
COMMENT