आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेस डेस्क- तुम्हाला एसी खरेदी करायची असेल तर, सध्या चांगली संधी आहे. सरकारी कंपनी एनर्जी इफिसिएन्सी सर्विसेज लिमिटेडने AC ची विक्री सुरू केली आहे. या AC किमंत इतर कंपन्यांच्या AC पेक्षा कमी आहे. जाणून घ्या काय खास आहे या AC मध्ये...
न्यूज एजंसी पीटीआयने सांगितल्यानुसार एनर्जी इफिसिएन्सी सर्विसेज लिमिटेडने फेब्रुवारी 2019 मध्ये घरगुती वापरासाठी आणि औद्योगीक वापरासाठी उच्च दक्षता एअर कंडीशनिंग कार्यक्रमाची सुरूवात केली होती. या कार्यक्रमा अंतर्गत AC सादर करण्यात आली.
ईईएसएलचे एमडी सौरभ कुमारने सांगितले की, पहिल्या टप्प्यात दिल्लीमध्ये बीएसईएस राजधानी पॉवर लिमिटेड, बीएसईएस यमुना पॉवर लिमिटेड आणि टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्यूशन लिमिटेडच्या ग्राहकांसाठी 50,000 AC उपलब्ध केले जातील. त्यांनी सांगितल की, हे AC ''आदी जो येईल, त्यांनाच मिळेल''या आधारावर मिळती. तसेच दिल्लीशिवाय इतर क्षेत्रांसाठीही ऑर्डर स्विकारल्या जातील.
ऑर्डर कशी करायची
न्यूज एजंसीनुसार ग्राहक ईईएसएलच्या ऑनलाइन पोर्टल ''ईईएसएल मार्ट''च्या माध्यमातून AC ला ऑर्डर करू शकतात. याची किंमत 41,300 रुपये आहे. यात जीएसटी आणि डिलीव्हरी चार्ज सामिल आहेत. 1.5 टन इन्वर्टरच्या एसीच्या सप्लाची जबाबदारी व्हाल्टाजची असेल.
बाजार भावापेक्षा कमी किंमत
सौरभ कुमारने सांगितले की, एसीची किंमत बाजारात मिळाणाऱ्या एसीपेक्ष कमी असेल. आमच्या प्रोडच्या तुलनेत बाजार असलेल्या 5- स्टार रेटिंग एसीची किमंत 50,000 रुपयांपर्यंत आहे.
त्यांच्यानुसार प्रोडक्ट फक्त स्पिलिट एसी आहे, ज्याची रेटिंग 5.4 स्टार आहे. ही विज वाचवून वर्षाला 300 यूनिटची सेव्हींग करेल. त्यांनी सांगितले की, या शर्यतीत तीन कंपन्या सामिल होत्या. ज्यात 41,300 रुपयांच्या बोलीसोबत वोल्टास सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली आणि तेच एसीची डिलीव्हरी करतील. त्यांच्याशिवाय डाइकिनने 46,000 रुपयांची बोली लावली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.