आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी इंग्रजांची शान होती ही कंपनी, आता मोदी सरकार लावणार कुलूप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) बैठकीत Biecco Lawrie लिमिटेड कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रंजक गोष्ट म्हणजे ही कंपनी कधीकाळी इंग्रजांची शान होती. या कंपनीचे पंखे बेको फॅन खूप प्रसिद्ध होते आणि स्वस्त असल्यामुळे यांचा खपही जास्त होता. या कंपनीचा 100 वर्षांचा इतिहास आहे आणि आज मोदी सरकारने ही कंपनी बंद करण्याची घोषणा केली आहे.


कशामुळे केली बंद
या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, Biecco Lawrie लिमिटेड नावाची ही कंपनी सीपीएसयू आहे आणि अनेक वर्षांपासून तोट्यात चालू आहे. या कंपनीचे नेटवर्थ मायनस 78 कोटी रुपये आहे आणि 31 मार्च 2018 पर्यंतचा लॉस 143.95 कोटी रुपये आहे. या कंपनीला पुन्हा उभे करण्याचे सरकारचे पूर्ण प्रयत्न अपयशी ठरले, यामुळे ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.


100 वर्षांपूर्वी सुरु झाली होती ही कंपनी 
वर्ष 1919 मध्ये या कंपनीची सुरुवात झाली होती. त्यावेळी या कंपनीचे नागाव ब्रिटिश इंडिया इलेक्ट्रिक कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड होते.
1919 - मध्ये या कंपनीने टी गार्डन मशीनचे मॅन्युफॅक्चरिंग आणि रिपेअरिंगचे काम सुरु केले.
1924 - मध्ये येथे लेक्ट्रिकल रिपेअर शॉप चालू झाले.
1932 - मध्ये कंपनीने Biecco Fans ची सुरुवात केली. याचा उद्देश भारतासारख्या मोठ्या मार्केटमध्ये ओळख निर्माण करणे असा होता. यामुळे स्वस्त किमतीत पंखे विकणे सुरु झाले.
1939 - मध्ये कंपनीने पहिल्यांदा भारतात इलेक्ट्रिक मोटर्स बनवण्याचे काम सुरु केले आणि फार कमी वेळेत भारतीय मार्केटमध्ये Biecco Motors ने दबदबा केला.


पुढे वाचा, वर्ल्ड वॉरमध्ये झाली फेमस...

बातम्या आणखी आहेत...