आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi Has Never Campaigned For Trump In America! Foreign Ministers Clarify On The Announcement Now, The Trump Government

मोदींनी अमेरिकेत ट्रम्प यांचा प्रचार केलाच नाही! 'अबकी बार, ट्रम्प सरकार' घोषणेवर परराष्ट्र मंत्र्यांचे स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाउडी मोदी कार्यक्रमात ‘अबकी बार, ट्रम्प सरकार’ ची घोषणा दिली होती. ती घोषणा ट्रम्प यांचा प्रचार करणे नव्हेच असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाकडून आले आहे. भारताने कधीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कुणाचीही बाजू किंवा समर्थन केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाउडी मोदी कार्यक्रमात ट्रम्प यांचा नारा दिला होता. त्यावर बोलताना, मोदींनी केवळ ट्रम्प यांच्या 2016 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचाराची आठवण काढली. तो प्रचार नव्हताच असे जयशंकर यांनी सांगितले आहे.

जयशंकर पत्रकारांशी संवाद साधताना पुढे म्हणाले, "2020 मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूक होणार आहे. त्यामध्ये भारताने कुणाचेही समर्थन केलेले नाही. अमेरिकेचे राजकारण आणि निवडणूक यात भारत कुणाचीही बाजू घेत नाही. पीएम मोदींचे भाषण लक्षपूर्वक ऐकल्यास त्यांनी ‘अबकी बार, ट्रम्प सरकार’ ही घोषणा देऊन त्याच्याशी आपला संबंध जोडला. ही मोदींनी काढलेली एक जुनी आठवण होती, दुसरे काहीच नाही." पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतील भारतीय समुदायाला संवाद साधण्याचा कार्यक्रम प्रत्यक्षात ट्रम्प यांची प्रचार सभा होती अशी टीका विरोधकांनी केली होती. या कार्यक्रमात मोदींसोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील व्यासपीठावर होते. मोदींनी हाउडी मोदी कार्यक्रमात ट्रम्प यांच्या प्रचाराचा नारळ फोडला अशीही टीका केली जात आहे. परंतु, परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.