आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाडीतील ७ वर्षीय चिमुकलीसोबत मोदींचा नियमित पत्र व्यवहार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आपली कामे व्हावीत म्हणून राजकारण्यांना अनेक जण पत्र लिहितात...अनेकांचा त्यांच्याशी नियमित पत्र संपर्कही असतो... काही राजकारणी मतदारांच्या पत्रांना नियमित उत्तरे देतात. तो त्यांच्या जनसंपर्काचा एक भाग असतो. पण केवळ निखळ आनंदासाठी एखादा राजकारणी एखाद्या चिमुकलीशी नियमित पत्रव्यवहार करीत असेल आणि ती व्यक्ती साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर...नागपुरातील अनन्या वशिष्ठ या ७ वर्षीय चिमुकलीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमित पत्र व्यवहार करीत आहेत. 


नागपूरच्या वाडी येथील अनन्या वशिष्ठच्या प्रत्येक पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवर्जून उत्तर येते.. एवढेच नाही अनन्याला तिच्या वाढदिवसाला मोदींनी आवर्जुन शुभेच्छा देणारे पत्र पाठवले होते. हजारीपहाड येथील सांदीपनी शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अनन्याने सप्टेंबर २०१७ मध्ये पहिल्यांदा मोदींना पत्र लिहिले होते. तेव्हापासून गेल्या वर्षभरात मोदींची ५ वेळा अनन्याला पत्र आले आहे.. 


गेल्या वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने तेव्हा सहा (तेव्हाचे वय) वर्षांच्या अनन्याने पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांना त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी पत्र पाठविले होते. चिमुकलीने आपल्या पेन्सिलने तिच्या शाळेतील डायरी मध्ये लिहिलेला संस्कृत श्लोक "सुदिनं सुदिनं तव जन्मदिन, भवतु मंगल तव जन्मदिन' लिहून पाठविला होता. त्यानंतर काही दिवसांनी अनन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर मिळाले. आपल्या उत्तरात तेव्हा मोदींनी शुभेच्छासाठी धन्यवाद देताना अशा शुभेच्छा आणखी जास्त काम करण्याची ऊर्जा देतात असे लिहिले होते. त्यानंतर अनन्याने दिवाळीच्या वेळेला दिलेल्या शुभेच्छांनाही पंतप्रधानांनी उत्तर दिले होते. यावर्षी रक्षाबंधनाला अनन्याने पंतप्रधानांना राखी पाठविली होती.. तेव्हा मोदी यांनी राखी मिळाल्याचे धन्यवाद पत्र अनन्याला पाठविले होते... 

बातम्या आणखी आहेत...