आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका करणाऱ्या 10 जणांपेक्षा मोदी प्रबळ; रजनीकांत भाजपला अनुकूल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई -  आघाडीचे तामिळ अभिनेते रजनीकांत यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदी यांचे पारडे जड केले. पंतप्रधान मोदी हे त्यांच्यावर टीका करणाऱ्या १० जणांपेक्षा प्रबळ असल्याचे रजनीकांत यांनी सांगितले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष महाआघाडीची मोट बांधण्याच्या तयारी असल्याच्या चर्चेत रजनीकांतचे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे.  
रजनीकांत म्हणाले, दहा जण एकाविरुद्ध एकत्र येत असतील तर शक्तिशाली कोण? ते दहा जण की ज्यांच्यावर आरोप केला जातो ते? विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीबाबत विचारलेल्या प्रश्नावर रजनीकांत बोलत होते.  भाजप हा निवडणुकीच्या दृष्टीने धोकादायक पक्ष आहे काय, या सोमवारी विचारलेल्या प्रश्नावर रजनीकांत यांनी त्यांना (विरोधी पक्ष) तसे वाटत असेल तर तसे असू शकते, अशी प्रतिक्रिया दिली होती.  

 

महाआघाडीसाठी नायडू प्रयत्नशील  
टीडीपीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्याचा भाग म्हणून नुकतीच द्रमुक अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांची भेट घेऊन चर्चा केली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाजपविरोधात आघाडीचा पुरस्कार केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्रातील भाजप सरकारवर टीका करत आहेत.  

 

रजनीकांतचा भाजपकडे कल  
पंतप्रधान मोदी यांनी रजनीकांत यांची एक-दोन वेळेस भेट घेतली. दोघांमध्ये चांगला समन्वय असल्याचे मानले जाते.या दरम्यान मोदी स्वत: त्यांच्या निवासस्थानी जाऊन रजनीकांतला भेटले होते. त्यामुळे रजनीकांत भाजपकडे झुकल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. असे असले तरी त्यांनी २०१६ मध्ये नोटबंदी दोषपूर्ण पद्धतीने लागू केल्याचे वक्तव्य सोमवारी केले.  

 

भाजपसोबत जाण्याचा प्रश्न टाळला  : मोदींना शक्तिशाली ठरवण्याचा अर्थ कसा लावायचा, यावर रजनीकांत यांनी अधिक बोलणे टाळले. भाजपसोबत जाणार का, या प्रश्नावरही त्यांनी नंतर ठरवले जाईल, अशी प्रतिक्रिया दिली. रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २३४ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. रजनीकांत यांनी अद्याप नवा पक्ष जाहीर केलेला नाही.  

बातम्या आणखी आहेत...